Join us  

"RSS अन् NGO दिवसरात्र झटल्यानेच धारावी कोरोनामुक्त, सरकारला श्रेय देणं हा त्यांच्यावर अन्याय"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 3:23 PM

हे श्रेय राज्य सरकारचे नसून RSS अन् NGOचे असल्याचे मत भाजपा नेत्यानं मांडले आहे.

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 8 लाख 22,674 इतका झाला असून त्यापैकी 5 लाख 16,308 रुग्ण बरे झाले आहेत, तर 22,152 रुणांना प्राण गमवावे लागले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. राज्यात शुक्रवारी 7862 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 2 लाख 38,461 इतकी झाली आहे. एकूण 1 लाख 32,625 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण 95647 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. पण, या संकटात आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील कोरोना रोखण्यात यश आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं ( WHO) याचे कौतुक केलं आहे. पण, हे श्रेय राज्य सरकारचे नसून RSS अन् NGOचे असल्याचे मत भाजपा नेत्यानं मांडले आहे.

धारावी परिसर कोरोनापासून मुक्त होण्याच्या मार्गावर आहे.  WHOचे महासंचालक म्हणाले की, 'जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत की कोरोनाचा उद्रेक कितीही मोठा असला तरी तो नियंत्रणात आणला गेलेला आहे. यापैकी काही उदाहरणे इटली, स्पेन आणि दक्षिण कोरिया आणि धारावीमध्येही आढळतात. मुंबईतील या झोपडपट्टी परिसरातील लोकांची चाचणी, ट्रेसिंग, सामाजिक अंतर आणि संक्रमित रुग्णांवर त्वरित उपचार करण्याच्या पद्धतीमुळे धारावी कोरोनावर विजय मिळवण्याच्या मार्गावर आहे. डब्ल्यूएचओ महासंचालकांनी धारावी मॉडेलचं कौतुक करताना नेतृत्व, समाजाचा सहभाग आणि सामूहिक एकता यावर जोर दिला.''

पण, भाजपा नेते नितेश राणे यांनी हे राज्य सरकारचं श्रेय नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्विट केलं की,''राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आणि अन्य सेवाभावी संस्थांनी धारावीच्या अनेक भागांत दिवसरात्र काम केले. त्यांनी कोणताही गाजावाजा केला नाही. त्यांच्या मेहनतीमुळे धारावी आज कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्याचे श्रेय हे महाराष्ट्र सरकारला देणं हे त्या संस्थांवर अन्याय करण्यासारखं आहे.''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या सुपुत्राला सलाम; ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ शेतात गाळतोय घाम!

पुढील महिन्यात सुरू होणार ट्वेंटी-20 लीग; शाहरुख खानच्या संघातून खेळणार प्रविण तांबे!

दिल्ली टू केनिया व्हाया मुंबई; भारताचा क्रिकेटपटू करणार केनियाच्या राष्ट्रीय संघातून पदार्पण?

भारतीय क्रिकेटपटूची आई बनली 'कोरोना वॉरियर'; संकटकाळात करतेय 'बेस्ट' काम!

कोरोना व्हायरसच्या संकटात सुरेश रैना अन् रिषभ पंतची धम्माल मस्ती; Video Viral  

Bad News : इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचे निधन; क्रीडा विश्वातून हळहळ

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनीतेश राणे