७७ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचे अवयवदान, मुंबईत नववर्षातील पहिले योगदान

By संतोष आंधळे | Published: January 13, 2024 10:26 PM2024-01-13T22:26:38+5:302024-01-13T22:27:19+5:30

राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे.

Organ donation of 77-year-old senior citizen, Mumbai's first organ donation in New Year | ७७ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचे अवयवदान, मुंबईत नववर्षातील पहिले योगदान

७७ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचे अवयवदान, मुंबईत नववर्षातील पहिले योगदान

मुंबई : माहीम  येथील हिंदुजा रुग्णालयात शनिवारी ७७ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचा मेंदूमृत झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यामुळे अवयवांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या एका रुग्णाला  जीवनदान मिळाले आहे. या अवयवदानातून किडनी यकृत आणि डोळे दान केले गेले. हे मुंबई शहरातील या वर्षातील पहिले अवयव दान आहे.

राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. ज्या तुलनेत अवयवांची गरज आहे, त्या तुलनेत आपल्याकडे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान होत नाही. याकरिता अवयवदान जनजागृतीची गरज असून, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या अशा रुग्णांची राज्यातील प्रतीक्षा यादी महिन्यागणिक वाढत आहे. एका वर्षाला मेंदूमृत व्यक्तीकडून अवयव दान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे.

Web Title: Organ donation of 77-year-old senior citizen, Mumbai's first organ donation in New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.