१८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी १८ लाख डोस खरेदीचे आदेश - टोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 01:35 AM2021-05-05T01:35:40+5:302021-05-05T01:36:06+5:30

मंत्रालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते. राज्यात ४५ वर्षांवरील सुमारे १ कोटी ६५ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे

Order to purchase 18 lakh doses for vaccination for 18 to 44 year olds - caps | १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी १८ लाख डोस खरेदीचे आदेश - टोपे

१८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी १८ लाख डोस खरेदीचे आदेश - टोपे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील सुमारे १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून, अन्य काही जिल्ह्यांमध्ये त्यात वाढही होत आहे. लसीकरणाला वेग देण्यासाठी लसींचा पुरवठा आवश्यक असून, मंगळवारी राज्यात कोव्हिशिल्डचे ९ लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्याद्वारे ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल, तर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी सुमारे १८ लाख डोसेससाठी खरेदी आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मंत्रालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते. राज्यात ४५ वर्षांवरील सुमारे १ कोटी ६५ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कालपर्यंत राज्यात या वयोगटाच्या लसीकरणासाठी केवळ २५ हजार डोस शिल्लक होते. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद होते, असेही ते म्हणाले. 

४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण
nराज्याला ९ लाख डोस मिळाले आहेत. त्यातून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाईल. ४५ वर्षांवरील सुमारे ३.५ कोटी लोकसंख्येपैकी ४५ टक्के नागरिकांना लसीकरण झाले आहे.
n१ मेपासून १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणास सुरुवात झाली. या वयोगटातील सुमारे १ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे.  

nस्पुटनिक लस भारतात आली असून, तिच्या दराबाबत चर्चा सुरू असून, ते निश्चित झाल्यानंतर त्याचे डोस राज्यात मागविले जातील.
nतरुणाईने लसीकरणासाठी गर्दी करू नये. पोर्टलवर नोंदणी आणि दिनांक, वेळ निश्चितीनंतरच लस दिली जाईल. त्यामुळे संयम आणि शिस्त पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

nजागतिक निविदेच्या माध्यमातून राज्याला साडेतीन लाख रेमडेसिविर, २० हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, २७ स्टोरेज टँक उपलब्ध होतील. त्याद्वारे ऑक्सिजनचा बफर साठा करून ठेवता येईल.
nराज्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत १५० ऑक्सिजन प्लांट (हवेतून ऑक्सिजन शोषून घेणारे) खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. 
nकेंद्र शासनाकडून राज्याला १० पीएसए प्लांट मंजूर आहेत, त्यातील ९ प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे.

Web Title: Order to purchase 18 lakh doses for vaccination for 18 to 44 year olds - caps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.