Join us

'विरोधी पक्षालाही वाटतं देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 13:56 IST

नवीन पीढी भाजपाकडे आणि सेनेकडे आली त्यांची स्वप्ने होती. साहजिक होते. यामुळे दुरावा आला होता. मात्र, भाजपापेक्षा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवारांचे काम केले

मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती झाली असली तरी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना-भाजपामध्ये रस्सीखेच होणार हे नाकारता येत नाही. कारण 53 व्या वर्धापनदिनाचं निमित्त साधत शिवसेनेच्या सामनातून 54 व्या वर्धापनदिनी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावं असा निर्धार व्यक्त करत शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत. मात्र भाजपाकडून शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केले जात आहेत. 

भाजपा आमदार राम कदम यांनी यावर भाष्य करत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक सर्व स्तरातून होत आहे. सर्वांच्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री बनतील. शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे इतकचं काय तर विरोधी पक्षालाही वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं असं सांगत शिवसेनेला तसेच विरोधकांना टोला लगावला आहे. 

शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनी बोलताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा अप्रत्यक्षरित्या बोलून दाखविली होती. भावनेने केलेली युती महत्वाची आहे. मधल्या काळातील दुरावा नाहीसा झाला आहे. नवीन पीढी भाजपाकडे आणि सेनेकडे आली त्यांची स्वप्ने होती. साहजिक होते. यामुळे दुरावा आला होता. मात्र, भाजपापेक्षा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवारांचे काम केले. मातोश्रीवर केवळ सेनेचेच खासदार आले नव्हते तर भाजपचे देखील आले होते, असे उद्धव यांनी सांगितले. तसेच शेवटी समारोप करताना एका लग्नाची दुसरी गोष्ट कशी असावी असे सांगताना 'सर्व काही समसमान हवे' असे म्हणज काही वेळ पॉज घेतला आणि व्यासपीठावरील बोलतोय असे म्हणत मुख्यमंत्री पदाबाबत अप्रत्यक्ष इशारा दिला.  

मुख्यमंत्रीपदावरुन भाजपा-शिवसेनेचं ठरलं?; मुख्यमंत्री अन् उद्धव ठाकरे म्हणतात...

तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी मीडियाला रोज चर्चा हवी असते. तुम्ही त्या भानगडीत पडू नका, आमचे सगळेच ठरले आहे, योग्य वेळी जाहीर करू. तुम्ही युतीच्या विजयासाठी सज्ज व्हा, असे आवाहन केले. तर ‘मुख्यमंत्रिपदाबाबत आमचं ठरलंय, कोणी चिंता करू नका असं सांगितले. त्यामुळे युतीत सगळं काही आलबेल असल्याचा दावा शिवसेना-भाजपाकडून करण्यात येत असला तरी मुख्यमंत्रिपदावरुन युतीत दुरावा तर होणार नाही ना हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. 

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशिवसेनाभाजपा