Join us  

कोविड सेंटर उभारण्याचं कंत्राट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना; विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 8:47 PM

तसेच कोविड सेंटरमध्ये डॉक्टर, नर्सेस पुरवण्याचं कंत्राट एका धर्मादाय ट्रस्टला देण्यात आले, यात ट्रस्टचा पदाधिकारी शिवसेनेचा आहे.

ठळक मुद्देमुंबईतील आणखी काही भागात कोविड सेंटर उभारली गेली आहेतमुंबईकरांच्या पैशाची नासाडी थांबवावी अशी मागणी दरेकरांनी केली२ महिने झाले तरी फक्त ५० खाटा आहेत, अद्याप आयसीयू, व्हेंटिलेटर यांचा पत्ताच नाही

मुंबई – कोविड सेंटरच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट सुरु असून अनुभव नसणाऱ्या लोकांना कंत्राट देऊन कोविड सेंटर उभारली जात आहेत असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सेंटर उभे करण्याचं कंत्राट दिलं जात आहे असा आरोप करत या कंत्राटाची चौकशी केली जावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

प्रविण दरेकर यांनी आज मुलुंड येथील कोविड सेंटरला भेट दिली, त्याठिकाणी असलेल्या सुविधांचा अभाव पाहता रुग्णांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या. त्यानंतर संबंधित प्रकाराची चौकशी केली असता कोविड सेंटरचं कंत्राट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला दिल्याचं दिसून आलं. आयसीयू सुरु नसतानाही पैसे दिले जात आहेत. खाटा रिकाम्या असल्या तरीही बिल भागवले आहेत असा आरोप त्यांनी केला.

तसेच कोविड सेंटरमध्ये डॉक्टर, नर्सेस पुरवण्याचं कंत्राट एका धर्मादाय ट्रस्टला देण्यात आले, यात ट्रस्टचा पदाधिकारी शिवसेनेचा आहे. डॉक्टरांना ५० हजार पगार मिळतो पण महापालिकेकडून ट्रस्टला त्याच्या अनेक पट पैसे दिले जात आहेत. ७ जून रोजी हे कोविड सेंटर सुरु होणार होते, मात्र २ महिने झाले तरी फक्त ५० खाटा आहेत, अद्याप आयसीयू, व्हेंटिलेटर यांचा पत्ताच नाही. सेंटर सुरु झाल्यापासून २०० खाटांचे भाडे दिले जात आहेत. हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे. पालिका अधिकारी आणि ठेकेदार संगनमत करुन भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

मुंबईतील आणखी काही भागात कोविड सेंटर उभारली गेली आहेत. तिथेही असेच सुरु आहे. या प्रकाराची चौकशी करुन मुंबईकरांच्या पैशाची नासाडी थांबवावी अशी मागणी दरेकरांनी केली आहे. यापूर्वीही भाजपा आमदार नितेश राणे यांनी कोविड सेंटरच्या नावाखाली मुंबईकर जनतेच्या पैसे लुबाडले जात आहेत. कोणतंही टेंडर न काढताच कंत्राट दिले जात आहेत, यात कोणाला कंत्राट दिली जात आहेत याची सर्व माहिती असून विधानसभा अधिवेशनात नावासह हे उघड करणार असल्याचा इशारा नितेश राणेंनी दिला होता.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! सप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार? विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारनं बनवला प्लॅन

रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चौथऱ्यावरुन हटवला; मणगुत्तीमध्ये शिवप्रेमी संतापले

वाढदिवसानिमित्त वडील उद्धव ठाकरेंकडून पुत्र तेजसला अनोखं गिफ्ट; काय आहे पाहा...

बाईसाहेब, जरा सबुरीने घ्या; माजी पोलीस अधिकाऱ्याने लिहिलं अमृता फडणवीस यांना खुलं पत्र

“तुमच्या फायद्यासाठी माझ्या मुलीला बदनाम करु नका”; दिशा सालियानच्या आईवडिलांची आर्त विनवणी

टॅग्स :प्रवीण दरेकरशिवसेना