Join us  

आता शाळेत न जाता थेट परीक्षा देता येणार, सरकारकडून राज्य मुक्त मंडळाची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2019 6:43 AM

राज्य मुक्त मंडळाची स्थापना : कला, क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई : शाळेत पोहोचू न शकणारे दिव्यांग विद्यार्थी तसेच कला, क्रीडा क्षेत्रातच करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, या उद्देशाने राज्य मुक्त मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मुक्त शाळांसाठीच्या अर्जाची लिंक १० जानेवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्रीविनोद तावडे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

राज्याच्या मुक्त शाळांच्या स्वतंत्र मंडळामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची आवश्यकता नाही, हे विद्यार्थी थेट परीक्षा देऊ शकतात.मुक्त शाळा तीन स्तरांमध्ये असतील. इयत्ता पाचवी, आठवी, दहावी अशा स्तरांवर ही परीक्षा देता येईल. पाचवीची परीक्षा द्यायची असेल, तर विद्यार्थ्याच्या वयाची १० वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच १३ व्या वर्षी आठवी तर वयाच्या १५ व्या वर्षी दहावीची परीक्षा देता येईल. कलाकार, खेळाडू आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काम करण्यासाठी वेळ या निर्णयामुळे देता येईल, असे तावडे यांनी सांगितले.मुक्त शाळांचा स्वतंत्र अभ्यासक्रममुक्त शाळांमधील अभ्यासक्रम हा नियमित अभ्यासक्रमापेक्षा वेगळा असून, याची काठिण्य पातळी कमी असणार आहे.- विनोद तावडे, शिक्षणमंत्री

टॅग्स :विनोद तावडेशिक्षण