अध्यक्ष, उपाध्यक्षांनाच मिळाले २८ कोटी रुपये; न्यू इंडिया बँक घोटाळा; भानू दाम्पत्य परदेशात पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 06:44 IST2025-03-01T06:43:55+5:302025-03-01T06:44:26+5:30
New India Bank scam: भानू दाम्पत्याने घोटाळ्यातील पैसा विविध कंपन्यांमध्ये फिरविल्याची माहिती असून, पोलिस याचा तपास करत आहेत.

अध्यक्ष, उपाध्यक्षांनाच मिळाले २८ कोटी रुपये; न्यू इंडिया बँक घोटाळा; भानू दाम्पत्य परदेशात पसार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : न्यू इंडिया सहकारी बँकेच्या १२२ कोटींच्या घोटाळ्याचे धागेदोरे बँकेचे अध्यक्ष हिरेन भानू आणि उपाध्यक्ष गौरी भानू यांच्यापर्यंत पोहोचले असून, या दाम्पत्याला २८ कोटी रुपये मिळाल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. दोघांनाही आरोपी केले आहे. ते परदेशात पसार झाले आहेत.
भानू दाम्पत्याने घोटाळ्यातील पैसा विविध कंपन्यांमध्ये फिरविल्याची माहिती असून, पोलिस याचा तपास करत आहेत. तसेच अन्य आरोपी अरुणाचलम उर्फ अरुणभाई फरार आहे. त्याचा मुलगा मनोहर याला पोलिसांनी अटक केली.
लाय डिटेक्टर टेस्टसाठी अर्ज
मेहताने दिलेल्या माहितीत तफावत असल्याने त्याची लाय डिटेक्टर टेस्ट करण्याचा शुक्रवारी अर्ज केला आहे. तसेच यासाठी मेहतानेही होकार दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
ट्रस्टच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्यासाठी अरुण आणि मनोहर या पिता-पुत्राने मेहता याच्याकडून ४० कोटी घेतले होते. मनोहरला ४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.