‘शिवसेनेतच कार्यकर्त्यांचा राज्यकर्ता होऊ शकतो’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 01:13 AM2020-03-02T01:13:41+5:302020-03-02T01:13:48+5:30

शिवसेना ही अशी एक संघटना आहे की, शिवसेनेतच कार्यकर्त्यांचा राज्यकर्ता होऊ शकतो, असे प्रतिपादन परिवहनमंत्री व संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी केले.

'Only in Shiv Sena can be ruler of workers' | ‘शिवसेनेतच कार्यकर्त्यांचा राज्यकर्ता होऊ शकतो’

‘शिवसेनेतच कार्यकर्त्यांचा राज्यकर्ता होऊ शकतो’

googlenewsNext

मुंबई : शिवसेना ही अशी एक संघटना आहे की, शिवसेनेतच कार्यकर्त्यांचा राज्यकर्ता होऊ शकतो, असे प्रतिपादन परिवहनमंत्री व संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी केले. शिवसेना विभाग ४ आणि ५ यांच्या वतीने अनिल परब यांचा गौरव सोहळा अंधेरी पश्चिम शहाजी राजे क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, खासदार गजानन कीर्तिकर, महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर सुहास वाडकर, आमदार विलास पोतनीस, आमदार दिलीप लांडे याप्रसंगी उपस्थित होते. अनिल परब म्हणाले की, शिवसेनेच्या आंदोलनाच्या वेळी शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले. त्यांच्याबरोबर मीदेखील लॉकअपमध्ये असायचो. तर त्यांची बाजू न्यायालयात मांडत असताना ते दिवसभर कोर्टाबाहेर असायचे.
बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी कार्यकर्त्यांशी कसे वागावे याचे बाळकडू देत कार्यकर्ते आणि माणुसकी घडविण्याचे तब्बल ४५ वर्षे काम करत उत्तम राजकारणी निर्माण केले. शिवसेनाप्रमुखांनी युती सरकारच्या काळात पुण्यात २१ एकर जागा मला दिली. तिकडे शिवसृष्टी उभारण्याचे काम सुरू आहे.
सोहळ्यापूर्वी अनिल परब व पत्नी अनिता परब यांची रथावरून मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी भारावून गेलेल्या परब यांनी आपली लग्नातही अशी मिरवणूक निघाली नसल्याचे सांगितले.

Web Title: 'Only in Shiv Sena can be ruler of workers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.