पेण अर्बनची तीन वर्षांत केवळ अर्धा टक्का वसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 05:15 AM2018-12-11T05:15:05+5:302018-12-11T05:15:28+5:30

पेण अर्बन बँकेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कथित बोगस कर्जाची ५९८.७२ कोटी रुपयांची रक्कम प्राधान्याने वसूल करावी, असे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र गेल्या तीन वर्षांत केवळ ३.६९ कोटींची म्हणजे अर्धा टक्का वसुली विशेष कृती समितीने केली.

Only half a year recovery in three years of pen urbanization | पेण अर्बनची तीन वर्षांत केवळ अर्धा टक्का वसुली

पेण अर्बनची तीन वर्षांत केवळ अर्धा टक्का वसुली

Next

अलिबाग : पेण अर्बन बँकेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कथित बोगस कर्जाची ५९८.७२ कोटी रुपयांची रक्कम प्राधान्याने वसूल करावी, असे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र गेल्या तीन वर्षांत केवळ ३.६९ कोटींची म्हणजे अर्धा टक्का वसुली विशेष कृती समितीने केली.

ठेवीदारांच्या रकमेतून संचालकांनी विकत घेतलेल्या मालमत्तेच्या लिलावातून ठेवीदारांची मुद्दल उभी राहू शकते. यासाठी या समितीने जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता असल्याची माहिती पेण अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा विशेष कृती समितीचे सदस्य नरेन जाधव यांनी दिली आहे. समितीची आतापर्यंत ०.६१ टक्केच वसुली झाली आहे. बँकेला ठेवीदारांच्या ६१५ कोटी रुपयांच्या ठेवी परत करायच्या आहेत.

पूर्णवेळ अधिकारी नेमण्याची मागणी
प्रत्येक अधिकाऱ्याची दोन-तीन वर्षांतच बदली झाली. बैठकीतही सातत्य नसल्याने वसुली धिम्या गतीने होत असल्याचे म्हणणे पेण अर्बन संघर्ष समितीचे आहे. यासाठी ठरावीक वेळेसाठी पूर्णवेळ अधिकारी नेमावा, अशी मागणी संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Web Title: Only half a year recovery in three years of pen urbanization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक