Join us
Daily Top 2Weekly Top 5

ब्युटी पार्लरच्या नावाखाली ऑनलाइन लॉटरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 03:34 IST

गोवंडीतील शिवाजीनगरमध्ये अवैधरीत्या आॅनलाइन लॉटरी सेंटर सुरू होते.

मुंबई : ब्युटी पार्लरच्या नावाखाली इंटरनेटच्या माध्यमातून गोवंडीत आॅनलाइन लॉटरी सेंटरवर गुन्हे शाखेने छापा टाकला. या प्रकरणी सहा जणांना अटक झाली आहे.

गोवंडीतील शिवाजीनगरमध्ये अवैधरीत्या आॅनलाइन लॉटरी सेंटर सुरू होते. याबाबत गुन्हे शाखेच्या कक्ष चारचे प्रमुख पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांना माहिती मिळताच त्यांच्या पथकाने छापा टाकला. तेव्हा रेवोल्युशन ब्युटी पार्लरच्या नावाखाली चालविण्यात येणाऱ्या लॉटरी सेंटरसह इरफान आॅनलाइन, राजेश्री लॉटरी या ठिकाणी छापे टाकत उस्मान शेख (३८), फिरोज खान (२८), अब्दुल खत्री (६०), इरफान कुरेशी (३८), कुणाल पंजमुख (३०), हरुण सय्यद (४७) यांना अटक केली. या कारवाईत रोख रकमेसह हार्ड डिस्क, प्रिन्टर, बारकोड स्कॅनर आदी वस्तू जप्त करण्यात आल्या असून याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने या आरोपींना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस