ओनिडा कंपनी व्यवस्थापनाने अडवली शिष्यवृत्ती

By admin | Published: April 11, 2015 10:38 PM2015-04-11T22:38:32+5:302015-04-11T22:38:32+5:30

कुडूस येथील ओनिडा कंपनीने गेल्या आठ महिन्यापासून येथे काम करत असणाऱ्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रोखून धरली असून कंपनी व्यवस्थापनाकडे विचारणा केली

Onidha Scholarship to Stop Management by Company Management | ओनिडा कंपनी व्यवस्थापनाने अडवली शिष्यवृत्ती

ओनिडा कंपनी व्यवस्थापनाने अडवली शिष्यवृत्ती

Next

वाडा : कुडूस येथील ओनिडा कंपनीने गेल्या आठ महिन्यापासून येथे काम करत असणाऱ्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रोखून धरली असून कंपनी व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता तारीख पे तारीख व उडवा उडवीची उत्तरे देऊन बोळवण केली जाते. शनिवारी (ता. ११) सकाळी हे प्रशिक्षणार्थी कामावर आले असता त्याना गेटमधूनच बाहेर काढण्यात आले. कंपनीत काम नसल्याचे सांगून त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. मानधनाबाबत विचारणा केली असता कंपनी तोट्यामध्ये असून सध्या मानधन देता येणार नाही असे सांगण्यात आले. आपली फसवणूक होत आहे हे लक्षात येऊन विद्यार्थ्यांनी कंपनीच्या प्रवेशद्वरासमोरच ठिय्या ठोकला.
औद्योगिक शिक्षण (आयटीआय) देणाऱ्या संस्थामध्ये विद्यार्थी दहावी, बारावीनंतर दोन वर्षे तात्वीक शिक्षण घेतो. त्यानंतर त्यांना एक वर्ष शाखेनुसर संबंधीत कंपनीत प्रत्यक्षिक शिक्षण घ्यावे लागते. यासाठी विविध नामांकित कंपन्या स्वत: अशा आयटीआय महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना आपल्या कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्यास विनंती करतात किंवा बीटीआरआय या संस्थेकडून संबंधीत कंपनीला विद्यार्थी पुरवले जातात.
कंपनीला कमी पगारात कामगार मिळत असल्याने कंपनी व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी भरण्यास प्राधान्य देते. (वार्ताहर)

ओनिडा कंपनीत राज्यभरातुन १५० विद्यार्थी आले असून या विद्यार्थ्यांनी आयटीआय महाविद्यालयात इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्र आदी विषयांचे तात्विक शिक्षण घेतले असून प्रात्यक्षिक कौशल्य शिक्षण घेण्यासाठी ते या कंपनीत आठ महिन्यांपासुन काम करत आहेत. २२ सप्टेंबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार या प्रशिक्षणार्थींना ७ हजार ते ७ हजार ५०० रू. शिष्यवृत्ती मिळणे अपेक्षीत असताना कंपनी व्यवस्थापन केवळ ३ ते ३ हजार ५०० अशी शिष्यवृत्ती देते. यातही ही शिष्यवृत्ती केवळ कागदोपत्री असून प्रत्यक्षात या विद्यार्थ्यांना केवळ राबवून घेणे एवढाच फंडा व्यवस्थापनाकडून राबवला जातो. कंपनीत वर्षभर प्रात्यक्षिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र देते. या प्रमाणपत्रासाठीच विद्यार्थ्यांची एवढी मेहनत सुरू असते.

आठ महिन्यांपासुन आम्ही या कंपनीत काम करत आहोत. मोठ्या प्रमाणावर कंपनी पक्का माल तयार करते. मात्र तरी सुद्धा कंपनी तोट्यात असल्याचे खोटेच सांगुन आमचे मानधन कंपनीने रोखले आहे. कंपनीत आम्ही प्रशिक्षण घेण्यासाठी आलो असताना आम्हाला प्रात्यक्षिक शिक्षण देण्याऐवजी साफसफाई करणे, माल ट्रकमध्ये भरणे, जड सामान वाहणे अशी हमालीची कामे करायला लावून आमचे शोषण केले जाते नियमानुसार प्रशिक्षणार्थींनी २४० दिवस भरणे अपेक्षीत असताना कंपनी २७० दिवस राबवते. - रूतुराज खंडेराव

ओनिडा कंपनीने प्रशिक्षणार्थी म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना चांगली राहण्याची सुविधा, शिष्यवृत्ती, कुशल प्रशिक्षणांकडून प्रात्यक्षिक मार्गदर्शन अशी प्रलोभने दाखवली मात्र प्रत्यक्षात आम्ही जिथे राहतो त्या वस्तीगृहाची व्यवस्था अतिशय दयनीय असून पाणी, वीज यांचा तुटवडा आहे. पत्रे, दरवाजे तुटलेले असून भिंती कमकुवत झाल्या आहेत. पावसाळ्यात गळणाऱ्या या खोल्यांत साप, विंचु यांचा मुक्त संचार असतो.
- सय्यद वसीम, प्रशिक्षणार्थी

Web Title: Onidha Scholarship to Stop Management by Company Management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.