Join us

कामाचे पैसे दिले नसल्याच्या रागातून सिमेंटचा दगड डोक्यात घालून एकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 20:46 IST

तुळींज ओव्हरब्रीजच्या खाली घडली घटना

नालासोपारा (मंगेश कराळे) :- कॅटरसमध्ये केलेल्या कामाचे पैसे मागितल्यावर आरोपी तरुणाला कामावरून काढल्याच्या रागातून सिमेंटचा दगड डोक्यात घालून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना तुळींज ओव्हरब्रीजच्या खाली शुक्रवारी रात्री घडली आहे. तुळींज पोलिसांनी शनिवारी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केल्यावर हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्यावर रविवारी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगांव येथे राहणाऱ्या आरोपीत दीपक गुप्ता उर्फ बटला (२०) याने पप्पू (अंदाजे ३५ ते ४० वर्षे) यांच्याकडे केलेल्या कॅटरसच्या कामाचे पैसे मागितले. पप्पू यांनी दिपकला कॅटरसच्या कामाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून आरोपी दिपकने त्यांना साई बाजार येथून खेचत आत्मवल्लभ सोसायटीच्या समोरील ब्रीजखाली शुक्रवारी रात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास आणले. आरोपीने पप्पू यांच्या डोक्यात सिमेंटचा दगड घालून जीवे ठार मारले. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर मोरे (४२) यांनी चौकशीअंती फिर्याद देऊन हत्येचा गुन्हा रविवारी दाखल केला आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी