चेंबूरमध्ये ट्रकची स्लॅबला धडक, 3 जण सेप्टीक टँकमध्ये पडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 14:37 IST2019-04-03T14:27:31+5:302019-04-03T14:37:12+5:30
मुंबईत चेंबूरमध्ये वाशी नाका येथे ट्रकची स्लॅबला धडक बसून तीन जण सेप्टीक टँकमध्ये पडल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (3 एप्रिल) सकाळी ही घटना घडली.

चेंबूरमध्ये ट्रकची स्लॅबला धडक, 3 जण सेप्टीक टँकमध्ये पडले
मुंबई - मुंबईत चेंबूरमध्ये वाशी नाका येथे ट्रकची स्लॅबला धडक बसून तीन जण सेप्टीक टँकमध्ये पडल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (3 एप्रिल) सकाळी ही घटना घडली. टाकीत अडकलेल्या एका व्यक्तीला बाहेर काढण्यात यश आले असून एक महिला आणि लहान मुलगा अजूनही आत अडकल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चेंबुरच्या वाशीनाका येथील म्हाडा कॉलनीच्या समोरील विनय इंग्लिश हायस्कूलजवळ ही घटना घडली. ट्रकची स्लॅबला धडक बसून तीन जण सेप्टीक टँकमध्ये पडले. या घटनेची ही माहितीच मिळताच आरसीएफ पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून टाकीत पडलेल्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
#Mumbai: One person rescued, a woman and a child still stuck inside an underground septic tank they fell in after a truck hit the slab covering the tank, at MHADA colony, Vashi Naka, Chembur, today. Rescue operation underway, police also present at the spot. pic.twitter.com/nbZ3ebwMWn
— ANI (@ANI) April 3, 2019