Join us

गोरेगाव येथील छोटा काश्मीरच्या तलावात एक जण बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 18:33 IST

आरेच्या युनिट क्रमांक तीनमध्ये ते राहत असून घटनास्थळी अग्निशमन दल त्यांचा शोध घेत आहेत. आरे पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मुंबई - गोरेगाव येथील आरे कॉलनीत असलेल्या छोटा कश्मीर परिसरात गुरुवारी दुपारी ३. ४४ वाजताच्या सुमारास गणपत शिवराम ठसाळ (वय ५०) नावाची व्यक्ती बुडाली. मासे पकडण्यासाठी गणपत तलावात उतरले असताना बुडाल्याचा प्रकार घडला. आरेच्या युनिट क्रमांक तीनमध्ये ते राहत असून घटनास्थळी अग्निशमन दल त्यांचा शोध घेत आहेत. आरे पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

टॅग्स :मुंबईपोलिसपाण्यात बुडणे