त्या आक्षेपार्ह मजकुरावरून एकावर गुन्हा; तीन समन्सही बजाविण्यात आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 01:29 IST2025-02-22T01:29:28+5:302025-02-22T01:29:45+5:30

प्रोफाइलमध्ये ‘अपमानास्पद’ तपशील नमूद केला आहे. यापूर्वी महाराष्ट्र सायबर कडून विकिपीडियाला मजकूर हटविण्याबाबत तीन समन्सही बजाविण्यात आले होते.

One person charged with a crime for that offensive text; three summonses were also issued | त्या आक्षेपार्ह मजकुरावरून एकावर गुन्हा; तीन समन्सही बजाविण्यात आले

त्या आक्षेपार्ह मजकुरावरून एकावर गुन्हा; तीन समन्सही बजाविण्यात आले

मुंबई : विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांचे प्रोफाइल संपादित करून त्यात मजकूर टाकणाऱ्या व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र सायबर पोलिसांनी रत्नहस्तिन नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. प्रोफाइलमध्ये ‘अपमानास्पद’ तपशील नमूद केला आहे. यापूर्वी महाराष्ट्र सायबर कडून विकिपीडियाला मजकूर हटविण्याबाबत तीन समन्सही बजाविण्यात आले होते.

सायबर महाराष्ट्रने विकिपीडिया फाउंडेशनला नोटीस जारी करत हा मजकूर तातडीने हटविण्याची विनंती केली होती. मात्र, विकिपीडियाकडून काहीच प्रतिसाद आला नाही. रतनहस्तिन या व्यक्तीची ओळख शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी सायबर विभागाने माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवला.

Web Title: One person charged with a crime for that offensive text; three summonses were also issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई