Join us

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी एक; तानसा तलाव भरून वाहू लागला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 09:15 IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी तानसा तलाव बुधवारी सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता खात्याने दिली.

मुंबई :  मुंबईलापाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी तानसा तलाव बुधवारी सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता खात्याने दिली. तसेच पवई तलाव १८ जून, तर मोडक सागर ९ जुलै रोजी भरून वाहू लागला होता. दरम्यान, बुधवारी सकाळी ६ वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये त्यांच्या एकूण क्षमतेच्या ८६.८८ टक्के इतका जलसाठा आहे. मुंबईकरांना पाणी पुरवणाऱ्या ७ तलावांपैकी ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशया’चे तीन दरवाजे ७ जुलै रोजी उघडण्यात आले आहेत. 

तलाव यंदा लवकर भरलाठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा धरण आहे. तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता १४,५०८ कोटी लिटर (१४५,०८० दशलक्ष लिटर) एवढी आहे. हा तलाव गतवर्षी २४ जुलै रोजी पहाटे सव्वाचार वाजता, २०२३मध्ये २६ जुलै रोजी पहाटे साडेचार वाजता, २०२२ मध्ये १४ जुलैला रात्री ८:५० वाजता आणि २०२१ मध्ये २२ जुलैच्या पहाटे ५:४८ वाजता ओसंडून वाहू लागला होता. गेल्या काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे.

टॅग्स :पाणीमुंबई