One lakh 39,500 vaccines on corona were delivered in Mumbai | कोरोनावरील एक लाख ३९ हजार ५०० लसी मुंबईत दाखल

कोरोनावरील एक लाख ३९ हजार ५०० लसी मुंबईत दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  कोरोनावर मात करणाऱ्या कोविशिल्डचा एक लाख ३९ हजार ५०० लसीचा पहिला साठा बुधवारी पहाटे साडेपाच वाजता मुंबईत दाखल झाला. पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटची ही लस महापालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी विशेष वाहनांद्वारे पोलीस बंदोबस्तात मुंबईत आणली. मात्र, कांजूरमार्ग येथील कोल्ड स्टोअरेज अद्याप तयार नसल्याने परळ येथील एफ दक्षिण विभाग कार्यालयातील साठवणूक केंद्रात लसीचा साठा ठेवण्यात आला आहे. दररोज १४ हजार ४०० लोकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सव्वा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल.

पाच टप्प्यांमध्ये लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. १५ लसीकरण केंद्रांपैकी नऊ ठिकाणी ड्राय रन घेण्यात आली. उर्वरित सहा ठिकाणी १५ जानेवारी २०२१ रोजी ड्राय रन घेण्यात येईल. मात्र, लसीकरण झाल्यामुळे आपली जबाबदारी संपली नसून यानंतरही नागरिकांनी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे, हात धुणे या त्रिसूत्रीचे नियमितपणे पालन करणे गरजेचे असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: One lakh 39,500 vaccines on corona were delivered in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.