Join us

पत्नीसोबत फोनवर बोलण्याच्या वादातून एकाची हत्या तर एक गंभीर जखमी, विरारच्या साईनाथ नगर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 18:54 IST

सदर हल्ला हा प्रेमप्रकरणामुळे झाला असल्याची चर्चा विरारमध्ये सुरू आहे.

नालासोपारा (मंगेश कराळे) :- पत्नीसोबत फोनवर बोलण्याच्या झालेल्या वादातून विचारणा करण्यास गेलेल्या दोघांवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री साईनाथ नगर येथे घडली आहे. जखमी दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण रुग्णालयात उपचार घेत आहे. विरार पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केल्याचे सूत्रांकडून कळते.

विरारच्या साईनाथ नगर जानुवाडी येथील वज्रेश्वरी अपार्टमेंटमध्ये राहणारे दत्तात्रय अर्जुन शिंदे यांची पत्नी रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फोनवर भाऊबंदकीतील राहुल शिंदे याच्यासोबत बोलत होती. पत्नीसोबत फोनवर  इतक्या रात्री का बोलतो म्हणून दत्तात्रय शिंदे हे भाऊ सचिन शिंदे याला सोबत घेऊन साईनाथ नगर येथील शिवसेना ऑफिस समोर आरोपी राहुल शिंदे याला जाब विचारणासाठी गेले होते.

यावेळी राहुल शिंदे, किरण शिंदे व इतर एका आरोपीने त्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली होती. राहुल शिंदे यांनी दोघांवर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला यात सचिन शिंदे हा गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. जखमी दत्तात्रय शिंदे यांच्यावरती सध्या विरारच्या शुभम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सदर हल्ला हा प्रेमप्रकरणामुळे झाला असल्याची चर्चा विरारमध्ये सुरू आहे.

टॅग्स :गुन्हेगारी