BREAKING: वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन एकाची उडी, नौदलाकडून शोधकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 13:24 IST2023-07-31T13:20:54+5:302023-07-31T13:24:07+5:30
मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंक पुलावरुन एका व्यक्तीनं उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

BREAKING: वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन एकाची उडी, नौदलाकडून शोधकार्य सुरू
मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंक पुलावरुन एका व्यक्तीनं उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या व्यक्तीचं वय ५५ वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. पुलावरुन समुद्रात उडी घेत त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. घटनेची माहिती मिळताच नौदल आणि हेलिकॉप्टर देखील परिसरात पोहोचलं आहे. हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.
VIDEO: मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन एका व्यक्तीनं समुद्रात घेतली उडी, नौदलाच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं शोध सुरू #Mumbai#BandraWorliSeaLinkpic.twitter.com/HRFtSP9xmB
— Lokmat Mumbai (@LokmatMumbai) July 31, 2023
वांद्रे-वरळी सी-लिंकवर वाहनातून खाली उतरण्यास मनाई आहे. असं असतानाही या व्यक्तीनं कार थांबवून पुलावरुन खाली उडी घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. व्यक्तीचं नाव अद्याप कळू शकलेलं नाही. तसंच त्यानं असं का केलं याचंही कारण कळालेलं नाही. सध्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.