Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिने विस्टा स्टुडिओला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 12:52 IST

कांजूरमार्गमधील गांधीनगर भागात असणाऱ्या सिने विस्टा स्टुडिओला लागलेली भीषण आग नियंत्रणात आली आहे. मात्र या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

मुंबई -  कांजूरमार्गमधील गांधीनगर भागात असणाऱ्या सिने विस्टा स्टुडिओला लागलेली भीषण आग नियंत्रणात आली आहे. मात्र या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सिनेविस्टा स्टुडिओला लागलेल्या आगीत ऑडिओ असिस्टंट गोपी वर्मा यांचा मृत्यू झाल्याचे आज सकाळी उघडकीस आले. सिनेविस्टा स्टुडिओला शनिवारी संध्याकाळी आग लागली होती. 

बेपनहा या मालिकेचं शूटिंग सुरू असताना सिने विस्टा स्टुडिओला आग लागली. स्टुडिओमधील जनरेटरमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली असवी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.  'शनिवारी संध्याकाळी आठ वाजता स्टुडिओला आग लागली. सात फायर ब्रिगेडच्या गाड्या व चार वॉटर टँकर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या आगीत मोठ्या प्रमाणात सामान जळून खाक झाल्याची माहिती  आहे. 

टॅग्स :आगमुंबई