गुडन्यूज! नेरळ-माथेरान मिनी ट्रेन धावणार; अनियमित पावसामुळे यंदा पारंपरिक मुहूर्त हुकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 10:11 IST2025-10-27T10:11:19+5:302025-10-27T10:11:55+5:30

दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होणारी नेरळ-माथेरान मिनी ट्रेन यावर्षी उशिरा धावणार आहे.

On November 1 the first week the mini train will run from Neral railway station | गुडन्यूज! नेरळ-माथेरान मिनी ट्रेन धावणार; अनियमित पावसामुळे यंदा पारंपरिक मुहूर्त हुकला

गुडन्यूज! नेरळ-माथेरान मिनी ट्रेन धावणार; अनियमित पावसामुळे यंदा पारंपरिक मुहूर्त हुकला

माथेरान : दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होणारी नेरळ-माथेरान मिनी ट्रेन यावर्षी उशिरा धावणार आहे. पूर्वी दसऱ्यानंतर १५ ऑक्टोबरला ट्रेनचा मुहूर्त ठरवला गेला होता, मात्र सततच्या अनियमित पावसामुळे हा मुहूर्तही हुकला. परिणामी, यंदा तब्बल एक महिना उशीर झाला. मात्र, आता १ नोव्हेंबरला म्हणजेच पहिल्या आठवड्यात मिनी ट्रेन नेरळ रेल्वे स्थानकातून धावेल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी माध्यमांना दिली आहे. त्यामुळे नोव्हेंबरपासून माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी होणार आहे.

माथेरानमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी माती वाहून गेली असून, कड्यावरचा गणपती परिसरात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. या ठिकाणी रेल्वे ट्रॅकखालील भाग कमकुवत झाल्याने सुरक्षा भिंत उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पावसामुळे कामाचा वेग मंदावला असून, रेल्वे विभागाने या अडथळ्यांवर मात करण्यासाठी गती दिली आहे. नेरळ स्थानकाचे स्टेशन मास्तर गुरुनाथ पाटील यांनी अलीकडेच माथेरान मार्गावरील रेल्वे स्थानकांची पाहणी केली. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले असले तरी, मिनी ट्रेन लवकर सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. काही महत्त्वाची कामे मार्गी लागल्यानंतर मालवाहू ट्रेनची ट्रायल घेतली जाईल आणि त्यानंतरच अधिकृत घोषणा होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
 
हिवाळी हंगाम सुरू झालेला आहे. या हंगामात पर्यटकांना एकाच वेळी दोन अनुभव येत आहेत. 

१९०७ पासूनची ऐतिहासिक परंपरा

माथेरान मिनी ट्रेन ही १९०७ साली ब्रिटिश  काळात सर आदमजी पिरभाय यांनी सुरू केली. दरवर्षी १५ जून रोजी पावसाळ्यामुळे ट्रेन बंद केली जात असे आणि दसऱ्याच्या सुमारास पुन्हा सुरू केली जायची.

या ट्रेनमुळे माथेरानच्या पर्यटनाला मोठी चालना मिळते. परंतु यंदा अनियमित हवामानामुळे शिरस्ता मोडीत निघाल्याने पर्यटक आणि व्यापारी दोघेही नाराज आहेत. मे महिन्यातच सुरू झालेला पाऊस ऑक्टोबर संपायला आला तरी सुरूच आहे.

अमन लॉज-माथेरान शटल सेवा सेवेत

अमन लॉज ते माथेरान ही शटल सेवा सध्या सुरू असून पर्यटकांना तिचा आनंद घेता येतो आहे. मुसळधार पावसातही ही सेवा अखंडित सुरू राहिली आहे. त्यामुळे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना  दिलासा मिळत आहे.

मिनी ट्रेन १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा आमचा प्रयत्न होता. मात्र, आता साधारण १ नोव्हेंबरला पहिली नेरळपासून माथेरान मिनी ट्रेन सुरू करण्यात येणार आहे.
डॉ.  स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
 

Web Title : खुशखबरी! नेरल-माथेरान मिनी ट्रेन नवंबर में दौड़ेगी!

Web Summary : बारिश से बाधित नेरल-माथेरान मिनी ट्रेन नवंबर में शुरू होगी। भूस्खलन के बाद ट्रैक मरम्मत जारी है। अमन लॉज-माथेरान शटल सेवा जारी है।

Web Title : Good news: Neral-Matheran mini train to run in November!

Web Summary : Neral-Matheran mini train, delayed by rain, will start in November. Track repairs are underway after landslides. Aman Lodge-Matheran shuttle service continues.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.