मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयात 'ऑन जॉब ट्रेनिंग'  

By रेश्मा शिवडेकर | Published: January 4, 2024 02:55 PM2024-01-04T14:55:58+5:302024-01-04T14:56:37+5:30

Mumbai News: मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थ्यांना 'छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालया'त कार्यांतर्गत प्रशिक्षण (ऑन जॉब ट्रेनिंग) घेता येणार आहे. 

'On Job Training' for students of History Department of Mumbai University at Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Museum | मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयात 'ऑन जॉब ट्रेनिंग'  

मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयात 'ऑन जॉब ट्रेनिंग'  

- रेश्मा शिवडेकर  

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थ्यांना 'छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालया'त कार्यांतर्गत प्रशिक्षण (ऑन जॉब ट्रेनिंग) घेता येणार आहे. 

मुंबई विद्यापीठ आणि संग्रहालयात या संदर्भात नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीला विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्रकुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, संग्रहालयाचे महासंचालक डॉ. सब्यसाची मुखर्जी, क्युरेटर (एज्युकेशन आणि प्रोग्राम) वैदेही सवनाल, मानव्यविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल सिंह, सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. सुचित्रा नाईक, विभागप्रमुख प्रा. संदेश वाघ आणि प्रा. मंजिरी कामत उपस्थित होते. 

इतिहास विभागातील दुसऱ्या सत्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यांतर्गत प्रशिक्षणादरम्यान क्युरेटर, गाईड, संग्रहालय प्रदर्शनाचे आयोजन, जतन व संवर्धनाचे तांत्रिक ज्ञान, संग्रहालय व संग्रह व्यवस्थापन आणि वारसा संवर्धन या अनुषंगिक बाबींचे प्रशिक्षण उपलब्ध होऊ शकेल, असे इतिहास विभागप्रमुख प्रा. संदेश वाघ यांनी सांगितले. 

संग्रहालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या डोसेंट प्रोग्रामअंतर्गत इतिहास विभागातील निवडक विद्यार्थी येथे कार्यरत आहेत. भविष्यात या कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे इतिहास विभागातील प्राध्यापिका आणि संग्रहालयाच्या विश्वस्त प्रा. मंजिरी कामत यांनी सांगितले. हे कार्य करीत असताना विद्यार्थ्यांना प्रसिद्ध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय इतिहासकारांसोबत संवाद साधण्याची संधीही उपलब्ध होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यांतर्गत प्रशिक्षणसाठी (ऑन जॉब ट्रेनिंग) तरतूद करण्यात आली आहे. 

कार्यांतर्गत प्रशिक्षणासाठी विद्यापीठातील विविध विभागांनी पुढाकार घेतला असून त्यानुसार अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. उद्योन्मुख क्षेत्रातील गरजा व संधी यानुसार विद्यार्थ्यांना शिकतानाच प्रात्याक्षिक ज्ञान, अनुभव आणि प्रशिक्षण उपलब्ध व्हावे याअनुषंगाने इतिहास विभागातील दुसऱ्या सत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयात कार्यांतर्गत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
-प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
 
येत्या काळात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीसोबतही कार्यांतर्गत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
- प्रा संदेश वाघ

Web Title: 'On Job Training' for students of History Department of Mumbai University at Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Museum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.