मधुमेहाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

By Admin | Updated: July 6, 2016 01:58 IST2016-07-06T01:58:24+5:302016-07-06T01:58:24+5:30

मधुमेहाला कंटाळून ६३ वर्षीय वृद्धाने तीन मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केली. भिकू गोविंद प्रभाकर असे मृत वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Older suicide committed by diabetic | मधुमेहाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

मधुमेहाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

मुंबई : मधुमेहाला कंटाळून ६३ वर्षीय वृद्धाने तीन मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केली. भिकू गोविंद प्रभाकर असे मृत वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मुलुंड एलबीएस मार्गावरील कामगार वसाहतीत प्रभाकर हे मुलासोबत राहायचे. कामगार रुग्णालयात ते सुरक्षारक्षक म्हणून कामाला होते. सहा वर्षांपूर्वी गँगरीनमुळे त्यांचा एक पाय कापावा लागला. त्यानंतर त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने अंथरुणाला खिळले होते. कामावर जाणे शक्य नसल्याने त्यांच्या जागेवर त्यांच्या मुलाला कामावर घेण्यात आले. त्यांनी गच्चीवरून उडी मारल्यानंतर जोरात आवाज झाला म्हणून तळमजल्यावरील कुटुंबीयांना जाग आली. त्यांनी बाहेर येऊन पाहिले तेव्हा प्रभाकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. कुटुंबीयांना माहिती देत त्यांना तत्काळ मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुलुंड पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरू असल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Older suicide committed by diabetic