मुंबई : भक्ती पार्क जवळील मोनो रेल्वे स्टेशननजीक ऑईल टँकरचा अपघात झाल्याने भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये एकाचा मृतदेह सापडला असून टँकरचा चालक असण्याची शक्यता आहे.
आग विझविल्यानंतर टँकरच्या केबिनमधून एक जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला असून त्याला पोलिसांच्या व्हॅनमधून शीव रुग्णालयात नेण्यात आले. तसेच हा टँकर कोणत्या कंपनीचा होता हे अद्याप समजू शकले नसल्याने भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियमसह एजिसच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आल्याचे अग्निशामन दलाने सांगितले.