पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 05:44 IST2018-05-16T05:44:50+5:302018-05-16T05:44:50+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर ‘फेसबुक’ आणि ‘टिष्ट्वटर’वर पोस्ट करण्यात आला.

Offensive post against the prime minister and the chief minister on social media | पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट

पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर ‘फेसबुक’ आणि ‘टिष्ट्वटर’वर पोस्ट करण्यात आला. नाणार प्रकल्पावरुन सोशल मिडीयावर ही पोस्ट करण्यात आली आहे़ त्यामध्ये मोदी, फडणवीस आणि त्यांच्या पत्नीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आाहे. त्यांना जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आली आहे. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी जुहू पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला. ही बाब भाजपच्या महिला कार्यकारिणी सभासदाने पाहिली. त्यांनी जुहू पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली. जे नाव टिष्ट्वटर आणि फेसबुकवर वापरण्यात आले आहे ते फेक असण्याचीही शक्यता आहे़

Web Title: Offensive post against the prime minister and the chief minister on social media