The number of slums in Mumbai has decreased by 5 lakh | मुंबईत झोपडपट्टीतील संख्या ५ लाखांनी घटली

मुंबईत झोपडपट्टीतील संख्या ५ लाखांनी घटली

टेकचंद सोनवणे ।

नवी दिल्ली : दिवसेंदिवस महानगरांमध्ये झोपडपट्ट्या बकाल होत असताना मुंबई व दिल्लीत मात्र झोपड पट्टयांंमध्ये राहणाऱ्यांची संख्या घटली आहे. मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्यांची संख्या तब्बल २० टक्क्यांनी कमी झाल्याचे केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. अर्थात त्यासाठी काही उपाययोजना केल्याची माहिती मात्र मंत्रालयाने दिली नाही.

सुप्रिया सुळे, डॉ. सुभाष भामरे व डॉ. अमोल कोल्हे या खासदारांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती अधिवेशनादरम्यान लोकसभेत सरकारकडून देण्यात आली. दिल्ली, मुंबईच्या तुलनेत चेन्नईत मात्र झोपडपट्टीत राहणाºयांची लोकसंख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे.मुंबईतील झोपडपट्टीत २००१ साली ६४ लाख ७५ हजार ६४० जण राहत होते. जनगणनेत हा आकडा ५२ लाख ६ हजार ४७३ नोंदवण्यात आला आहे. या योजनेची विस्तृत माहिती मात्र सरकारने दिली नाही.

18,51,231
लोक दिल्लीच्या झोपडपट्टीत
रहायचे. त्यांची संख्या आता
17,85,890
इतकी आहे. चेन्नईचा आकडा मात्र
8,19,873
वरून
13,42,337
वर गेल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

झोपडपट्टीवासीयांच्या मूलभूत गरजांची पूर्ती झाली नसल्याचे आकडेवारी सांगते.
20.3%


लोकांच्या घरासमोर कुपनलिका आहे. १० टक्के कुटुंबे अंधारात असून ४४ टक्के शौचालयापासूनही वंचित आहे. सांडपाणी व्यवस्थापन हे १९ टक्के लोकांना माहितीही नाही.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The number of slums in Mumbai has decreased by 5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.