लांब पल्ल्याच्या प्रवासी संख्येत १३ टक्क्यांनी वाढ

By Admin | Updated: April 25, 2016 03:26 IST2016-04-25T03:26:21+5:302016-04-25T03:26:21+5:30

एप्रिल महिन्यात लग्नाच्या असलेल्या मुहूर्तांमुळे मध्य रेल्वेला त्याचा चांगलाच फायदा झाला आहे. एप्रिल महिन्यातील सुरुवातीच्या वीस दिवसांत मध्य रेल्वेवर मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या

The number of long distance passengers increased by 13 percent | लांब पल्ल्याच्या प्रवासी संख्येत १३ टक्क्यांनी वाढ

लांब पल्ल्याच्या प्रवासी संख्येत १३ टक्क्यांनी वाढ

मुंबई : एप्रिल महिन्यात लग्नाच्या असलेल्या मुहूर्तांमुळे मध्य रेल्वेला त्याचा चांगलाच फायदा झाला आहे. एप्रिल महिन्यातील सुरुवातीच्या वीस दिवसांत मध्य रेल्वेवर मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत तब्बल १३.४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
उन्हाळ्यात मध्य रेल्वेकडून मोठ्या संख्येने जादा गाड्याही चालविण्यात येत आहेत. या जादा गाड्यांचा फायदा प्रवाशांना मिळत असल्याचे रेल्वेतील अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. मध्य रेल्वेकडून उत्तर भारतासह दक्षिण भारत आणि कोकणात अनेक गाड्या चालविण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The number of long distance passengers increased by 13 percent