आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 07:57 IST2025-12-23T07:57:39+5:302025-12-23T07:57:48+5:30
९ जून रोजी मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने समिती गठित करून सविस्तर चौकशी अहवाल तयार केला.

आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंब्रा–दिवा दरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर प्रवासी सुरक्षेबाबत सादर करण्यात आलेल्या चौकशी अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या डब्यांच्या पन्हाळीची जागा बदलण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलच्या दरवाजाच्या पन्हाळीला धरून उभे राहणाऱ्या प्रवाशांचे वांधे होणार आहेत. सध्या २ ते ३ डब्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात
आले आहेत.
९ जून रोजी मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने समिती गठित करून सविस्तर चौकशी अहवाल तयार केला. अहवालात लोकलचे दरवाजे कायम उघडे असल्याने अनेक प्रवासी फुटबोर्डवरून किंवा डब्याच्या वरील पन्हाळीला लटकून प्रवास करतात, त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो, असे स्पष्ट नमूद करण्यात आले होते. मुंब्रा दुर्घटनेचे हेच प्रमुख कारण असल्याचे चौकशी समितीने अधोरेखित केले होते. त्यानुसार निर्णय घेण्यात आला.
पन्हाळीचा आकार बदलला
अपघात टाळण्यासाठी समितीने लघुकालीन व दीर्घकालीन उपाययोजना सुचवल्या असून, त्यांची अंमलबजावणी आता सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कुर्ला कारशेडमध्ये सध्या हे बदल सुरू असून, दरवाजाजवळील पन्हाळीचा आकार धनुष्यबाणासारखा उंचावण्यात आला आहे, जेणेकरून ती पकडून प्रवासी लटकू शकणार नाहीत.