आता ‘स्पार्क’ शोधणार; वीजनिर्मिती का बंद झाली? मुख्य अभियंता डॉ. वाठ यांनी केले उपकरणाचे संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 01:47 PM2023-08-03T13:47:12+5:302023-08-03T13:47:40+5:30

सौर ऊर्जेच्या निर्मितीमध्ये सौर फोटोव्होल्टेइक पॅनेल केंद्रबिंदू आहे. सौर पॅनेलद्वारेच सूर्याच्या उष्णतेचा, ऊर्जेचा उपयोग करून त्याचे विजेमध्ये रूपांतर केले जाते...

Now will find the spark; Why was the power generation stopped Chief Engineer Dr. Vath researched the device | आता ‘स्पार्क’ शोधणार; वीजनिर्मिती का बंद झाली? मुख्य अभियंता डॉ. वाठ यांनी केले उपकरणाचे संशोधन

आता ‘स्पार्क’ शोधणार; वीजनिर्मिती का बंद झाली? मुख्य अभियंता डॉ. वाठ यांनी केले उपकरणाचे संशोधन

googlenewsNext

 
मुंबई : सौर ऊर्जेच्या पॅनेलमधून वीजनिर्मितीची कार्यक्षमता कायम ठेवण्यासाठी ‘स्पार्क’ उपकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. महावितरणचे मुख्य अभियंता (चाचणी) डॉ.मनीष वाठ यांनी या उपकरणाचे संशोधन केले असून, नागपूर येथील विश्वेश्वरैया राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेमध्ये  विकसित या उपकरणाची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली.

सौर ऊर्जेच्या निर्मितीमध्ये सौर फोटोव्होल्टेइक पॅनेल केंद्रबिंदू आहे. सौर पॅनेलद्वारेच सूर्याच्या उष्णतेचा, ऊर्जेचा उपयोग करून त्याचे विजेमध्ये रूपांतर केले जाते. प्रत्येक सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये निर्धारित वीजनिर्मितीच्या क्षमतेनुसार सौर पॅनेल बसविले जातात. मात्र, वीजनिर्मितीच्या क्षमतेत सातत्य राखण्यासाठी साधारणतः २५ वर्षांचे आयुर्मान असलेल्या सौर पॅनेलची देखभाल व दुरुस्ती अतिशय महत्त्वाची आहे.

सौर पॅनेलकडून निर्धारित क्षमतेएवढी वीजनिर्मिती होत नसल्यास त्यासाठी कारणीभूत सौर पॅनेलमधील बिघाड, दोष किंवा विविध प्रकारचे अडथळे याबाबतची तपासणी व देखरेख ठेवण्यासाठी मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ यांनी ‘स्पार्क’ तंत्रज्ञान विकसित केले आहे. याद्वारे सौर फोटोव्होल्टेइक पॅनेलमधील बिघाड त्वरित शोधले जाऊन निर्धारित क्षमतेएवढी सौर ऊर्जा निर्मितीमधील सातत्य कायम ठेवणे आता शक्य झाले आहे.

‘स्पार्क’ उपकरणामध्ये प्रामुख्याने सौर पॅनेलच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी देखरेख प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्यासाठी पॅनेलच्या आवश्यक सर्व घटकांचा वारंवार आढावा घेतला जातो. तसेच, फोटोव्होल्टेइक पॅनेलसाठी किमान व्होल्टेज सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. 

या सेन्सरद्वारे पॅनेलच्या निर्धारित केलेल्या क्षमतेएवढ्या वीजनिर्मितीमध्ये काही अडथळे आल्यास ते शोधले जातात व त्याची माहिती दिली जाते. पीव्ही पॅनेल्सच्या आऊटपूट व्होल्टेजचे सातत्याने निरीक्षण, विश्लेषण व रिअलटाइम मॉनिटरींग केले जाते. तसेच निर्धारित व प्रत्यक्ष सुरू असलेली सौर ऊर्जा निर्मिती यांची तुलना केली जाते. सौर पॅनेलमधील ओपन सर्किट व शॉर्टसर्किटची माहिती दिली जाते. त्यासाठी या उपकरणात खास डिस्प्ले युनिट बसविण्यात आले आहे. 

पेटंटसाठी अर्ज 
मनीष वाठ संशोधित या उपकरणाच्या पेटंटसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. या संशोधनासाठी डॉ.वाठ यांना डॉ. मकरंद बल्लाळ यांनी मार्गदर्शन केले.

- कमी खर्च करून तयार केलेले ‘स्पार्क’ उपकरण देखभालमुक्त आहे.
-  वापरासाठी वीजदेखील अत्यंत कमी लागते.
-  सौर पॅनलमधील दोष हे उपकरण अचूकपणे शोधत असल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे.

Web Title: Now will find the spark; Why was the power generation stopped Chief Engineer Dr. Vath researched the device

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई