Join us  

राज्याचे मुख्यमंत्री कोण, याचाच आता खुलासा करा - आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 2:02 AM

वंचित बहुजन आघाडीच्या केंद्रीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी वीजबिलाच्या मुद्द्यावर सरकारवर टीका केली. वीजबिल माफीसंदर्भात ऊर्जामंत्र्यांची भूमिका दुटप्पी आहे.

मुंबई : लाॅकडाऊनच्या काळातील वाढीव वीजबिलात सवलत देऊ, असे राज्य सरकारच्यावतीने सांगण्यात आले होते. ५० टक्के वीज माफी करण्याबाबतचा प्रस्तावही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे दिला होता. मात्र, अर्थमंत्री अजित पवार यांनी हा प्रस्ताव दाबून ठेवल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर  यांनी सोमवारी केला. तसेच  राज्याचा मुख्यमंत्री नेमका कोण, अजित पवार की उद्धव ठाकरे हे आधी जाहीर करा, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

वंचित बहुजन आघाडीच्या केंद्रीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी वीजबिलाच्या मुद्द्यावर सरकारवर टीका केली. वीजबिल माफीसंदर्भात ऊर्जामंत्र्यांची भूमिका दुटप्पी आहे. हे राज्याचे दुर्दैव असल्याची  टीका आंबेडकर यांनी केली. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला वीजबिलासंदर्भात दिलासा द्यावा, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली. भाजप सध्या राज्यभरात वीजबिलावरून आंदोलन करत  आहे. परंतु त्यांना आंदोलन करण्याचा कसलाच नैतिक अधिकार नाही. भाजपच्या काळात वीजबिलाची वसुली न झाल्याने सरकारवर कोट्यवधी रुपयांचा बोजा पडला आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला.

टॅग्स :मुख्यमंत्रीप्रकाश आंबेडकर