Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता रेशन कार्डवर मोफत मिळणार साडी, अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला दरवर्षी एक साडी, २४ लाख कुटुंबांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 07:04 IST

राज्य यंत्रमाग महामंडळ ही संस्था ही योजना राबवणार आहे. २०२३-२४ या वर्षाकरिता महामंडळ एक साडी ३५५ रुपयांना खरेदी करणार आहे. 

मुंबई : रेशन दुकानावर अन्नधान्याबरोबरच आता साडीही मिळणार आहे. राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने या संदर्भातील निर्णय घेतला आहे. राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असून, प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत मिळणार आहे. विशेष म्हणजे, शासनाने निश्चित केलेल्या सणादिवशी या साडीचे वाटप होणार आहे.

राज्य शासनाकडून दिला जाणार निधीराज्य यंत्रमाग महामंडळ ही संस्था ही योजना राबवणार आहे. २०२३-२४ या वर्षाकरिता महामंडळ एक साडी ३५५ रुपयांना खरेदी करणार आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमाली यांसाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे.

५ वर्षांसाठी वस्त्राेद्याेग विभागाची याेजना- वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार ही योजना २०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली आहे. - राज्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांची संख्या २४ लाख ५८ हजार ७४७ इतकी आहे. या सर्व कुटुंबांना पुढील पाच वर्षे प्रत्येक वर्षी एक याप्रमाणे साडीचे मोफत वाटप केले जाणार आहे.

टॅग्स :महाराष्ट्र