महात्मा फुले योजनेत आता अवयव प्रत्यारोपण मोफत" गोरगरीब, गरजू रुग्णांना मिळतोय मोठा दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 11:36 IST2025-08-09T11:36:03+5:302025-08-09T11:36:23+5:30

त्यात शस्त्रक्रिया, औषधे, आयसीयू सुविधा, तपासण्या आदींचा समावेश असेल. खर्च ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास, विशेष निधीमधून भरपाई दिली जाईल.

Now organ transplant is free under Mahatma Phule Yojana Poor and needy patients are getting great relief | महात्मा फुले योजनेत आता अवयव प्रत्यारोपण मोफत" गोरगरीब, गरजू रुग्णांना मिळतोय मोठा दिलासा 

महात्मा फुले योजनेत आता अवयव प्रत्यारोपण मोफत" गोरगरीब, गरजू रुग्णांना मिळतोय मोठा दिलासा 

मुंबई : राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजना व्यापक करत अवयव प्रत्यारोपणाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यकृत, किडनी, हृदय, फुफ्फुस आदी अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेंतर्गत रुग्णालयांना पाच लाख रुपयांचे पॅकेज देण्यात येईल. त्यात शस्त्रक्रिया, औषधे, आयसीयू सुविधा, तपासण्या आदींचा समावेश असेल. खर्च ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास, विशेष निधीमधून भरपाई दिली जाईल.

आवश्यक कागदपत्रे
रुग्णाचे आधारकार्ड, रेशनकार्ड किंवा युपीआय कार्ड, एसईसीसी लाभार्थी क्रमांक, शासकीय ओळखपत्र (काही प्रकरणांत), डॉक्टरांचे सल्लापत्र किंवा उपचार नोंद.

लाभार्थी कोण? 
अंत्योदय/अन्न सुरक्षा रेशनकार्डधारक, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब, दिव्यांग, नोंदणीकृत बांधकाम कामगार, शासकीय मदतनिधीत शिकणारे विद्यार्थी.

योजनेत १,३२६ आजार समाविष्ट 
या योजनेत १,३२६ आजारांवर मोफत उपचार केले जातात. मात्र, नवीन विस्तार योजनेत अवयव प्रत्यारोपण, दुर्मिळ व अपवादात्मक आजार, दीर्घ कालावधीचे यासारखे २,६०० पेक्षा अधिक आजारांचा नव्याने समावेश होणार आहे. 

उपचार प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन 
प्रत्येक रुग्णालयातील आरोग्य मित्र ऑनलाइन पद्धतीने रुग्णांची नोंदणी करतात. रुग्ण नोंदणी, पात्रता पडताळणी, मंजुरी, बिलिंग, नंतरचा फॉलोअप हे सर्व काही ऑनलाइन पोर्टलवरून नियंत्रित केले जाते.

जादा खर्चही विशेष निधीतून  
अत्यवस्थ रुग्णांचा खर्च ठरवलेल्या मर्यादेपेक्षा अधिक झाल्यास विशेष निधीतून भरपाई दिली जाणार आहे. यामध्ये कॅन्सर, प्रत्यारोपण, दुर्मिळ आजार, आयसीयूमधील दीर्घकालीन उपचार यांचा समावेश आहे. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा अहवाल, संबंधित रुग्णालयाची विशेष निधीसाठी शिफारस आवश्यक आहे. ''

अशी होते प्रक्रिया
रुग्ण नोंदणी - रुग्णालयातील 
आरोग्य मित्रामार्फत
पात्रता पडताळणी - आधार/रेशनकार्ड व एसईसीसी यादी तपासणी
वैद्यकीय सल्ला व प्रस्ताव - डॉक्टरांकडून उपचार योजनेची नोंद
ऑनलाइन मंजुरी - शासन 
प्रणालीतून मान्यता
मोफत उपचार सुरू - मंजुरीनंतर रुग्णालयात उपचार सुरू
बिलिंग व क्लेम प्रक्रिया - 
प्रणालीतून थेट नोंद आणि भरपाई

Web Title: Now organ transplant is free under Mahatma Phule Yojana Poor and needy patients are getting great relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.