मुंबईत नेमणार आता डास अळी शोधक

By admin | Published: January 31, 2015 02:33 AM2015-01-31T02:33:45+5:302015-01-31T02:33:45+5:30

मुंबई शहर आणि उपनगरातील डेंग्यूचा फैलाव कमी करण्यासह डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई महानगरपालिका आता डास अळी शोधकाची नियुक्ती करणार आहे.

Now the mosquito lining detector will be set up in Mumbai | मुंबईत नेमणार आता डास अळी शोधक

मुंबईत नेमणार आता डास अळी शोधक

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील डेंग्यूचा फैलाव कमी करण्यासह डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई महानगरपालिका आता डास अळी शोधकाची नियुक्ती करणार आहे.
महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने डेंग्यूला रोखण्यासह काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत आणि काय करण्यात येत आहेत? याची माहिती देण्यासाठी यासंदर्भातील विविध बाबींचे सादरीकरण महापालिका मुख्यालयात करण्यात आले; या वेळी प्रशासनाने ही माहिती दिली. अनेक वेळा इमारती, चाळी, झोपड्या अशा अनेक वास्तव्य असलेल्या ठिकाणी पाणी साचल्यानंतर येथील लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचू लागते. विशेषत: डेंग्यूने थैमान घातल्यानंतर तर अनेकांना जीव गमवावा
लागतो. (प्रतिनिधी)

Web Title: Now the mosquito lining detector will be set up in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.