आता मोनोचे सारथ्य महिलांच्या हाती, ताफ्यात सामील होणार तीन महिला चालक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 03:19 IST2020-03-17T03:18:36+5:302020-03-17T03:19:39+5:30
मोनोरेलचा कारभार पाहणा-या एमएमआरडीए प्रशानाने तीन महिला चालक आणि ३ महिला स्टेशन मास्टर महिलांना प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आहे.

आता मोनोचे सारथ्य महिलांच्या हाती, ताफ्यात सामील होणार तीन महिला चालक
मुंबई - चेंबुर ते वडाळा आणि वडाळा ते जेकब सर्कल अशा दोन टप्प्यांमध्ये धावणाऱ्या मोनोचे सारथ्य आता महिलांच्याही हाती येणार आहे. मोनोरेलचा कारभार पाहणा-या एमएमआरडीए प्रशानाने तीन महिला चालक आणि ३ महिला स्टेशन मास्टर महिलांना प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. हे ४५ दिवसांचे प्रशासन असणार असून लवकरच हे प्रशिक्षण संपवून या महिला मोनो चालकांच्या ताफ्यात सामील होणार आहेत.
मोनोरेल सुरू झाल्यापासून पुरूष पायलटच मोनो चालवत होते, मात्र आता महिलांनीही या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्यास सुरूवात केली आहे. त्यांचे प्रशिक्षण संपताच ही जबाबदारी त्यांना दिली जाणार आहे.
मुंबईची लाईफलाईन असलेल्या पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर पहिल्यापासूनच महिला पायलट कार्यरत आहेत. सध्याच्या स्थितीमध्ये मोनोचे पाच रेक सुरू आहेत. २०१९ मध्ये एमएमआरडीएने दहा रेकसाठी निविदाही मागविल्या होत्या, मात्र या निविदांना योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने त्या रद्द करण्यात आल्या. यानंतर एमएमआरडीएकडून पुन्हा काढण्यात आलेल्या निविदांना आता दोन कंपन्यांकडून प्रतिसाद आला आहे.
आता मोनो रेक वाढवणार असल्याने एमएमआरडीएने कर्मचाऱ्यांना आधुनिक रेक हॅन्डल करणे, आॅपरेटींग आणि देखभाल या दृष्टीने प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सध्याच्या स्थितीत मोनोच्या दोन फेºयांमधील कालावधी हा २० ते २५ मिनिटांचा असून रेक आणी पायलटची संख्या वाढवून हा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.