आता मेल, एक्स्प्रेसचे टॉयलेट होणार दुर्गंधीमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 14:47 IST2026-01-30T14:47:15+5:302026-01-30T14:47:53+5:30

Western Railway: पश्चिम रेल्वेच्या एक्स्प्रेसमध्ये असलेल्या बायो-टॉयलेट प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यात येणार आहे. यासाठी लोअर परळ कार्यशाळा परिसरात ३ लाख लिटर क्षमतेचा अॅनएरोबिक मायक्रोबियल इनोक्युलम (बॅक्टेरिया) प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

Now Mail, Express toilets will be odor-free | आता मेल, एक्स्प्रेसचे टॉयलेट होणार दुर्गंधीमुक्त

आता मेल, एक्स्प्रेसचे टॉयलेट होणार दुर्गंधीमुक्त

- महेश कोले 
मुंबई - पश्चिम रेल्वेच्या एक्स्प्रेसमध्ये असलेल्या बायो-टॉयलेट प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यात येणार आहे. यासाठी लोअर परळ कार्यशाळा परिसरात ३ लाख लिटर क्षमतेचा अॅनएरोबिक मायक्रोबियल इनोक्युलम (बॅक्टेरिया) प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामुळे मेल/एक्स्प्रेसमधील बायो-टॉयलेटमधील दुर्गंधी कमी होणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मेल/एक्स्प्रेसमधून प्रवास करताना प्रवाशांच्या सुविधेसाठी टॉयलेटची सुविधा उपलब्ध केली आहे. बायो टॉयलेटमध्ये उत्सर्जित होणारे मलमूत्र रुळांवर पसरू नये यासाठी ट्रेनच्या शौचालयांमध्ये अंदाजे १२० लिटर क्षमतेच्या बायो-डायजेस्टर टाक्यांची व्यवस्था केली आहे. यामध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) अॅनारोबिक मायक्रोबियल या बॅक्टेरियाचा वापर केला जातो. हे विशेष बॅक्टेरिया ६-८ तासांत मानवी मलमूत्राचे पाणी आणि वायूंमध्ये विघटन करते. हा वायू आणि पाणी रुळांलगत सोडण्यात येते. दरम्यान याचा दुर्गंध कमी राखण्यासाठी बॅक्टेरियाची गुणवत्ता उत्तम आवश्यक असते.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या ही बॅक्टेरिया बाहेरून मागवण्यात येते. वाहतुकीदरम्यान त्यांची गुणवत्ता चांगली राखणे अनेकदा कठीण होते. परिणामी बॅक्टेरियाचे आयुष्यमान कमी होत असून, अनेकदा ट्रेन गेल्यावर आसपासच्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरते. यासाठी लोअर परळ कार्यशाळेमध्ये आता ही बॅक्टेरिया तयार करण्यात येणार आहे. जेणेकरून त्याची उपलब्धता गुणवत्तापूर्ण आणि वेळेत करणे शक्य होणार आहे. तसेच पैशांची देखील बचत होणार आहे.

"प्रवाशांचा प्रवास दर्जेदार करण्यावर नेहमीच भर असतो. ही सुविधा उपलब्ध झाल्यावर आमच्या गाड्यांतील बायो-टॉयलेटची गुणवत्ता व कार्यक्षमता आणखी सुधारेल. तसेच स्वच्छ भारत मिशनची उद्दिष्टे साध्य करण्यासही यामुळे मोठी मदत होणार आहे." - विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

बॅक्टेरियाचे महत्त्व
१. एका ट्रेनच्या बायो-डायजेस्टर टाकीमध्ये ६० लिटर बॅक्टेरियाची आवश्यकता असते. त्याची सध्याचे आयुष्यमान १८ महिने असून त्यानंतर ती पूर्ण बदलावी लागते. तर अनेकदा पाण्यासोबत ती वाहून जात असल्याने त्याचे रिफील करणे आवश्यक असते.

२. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातील मेल/एक्स्प्रेसचे १२५० पेक्षा जास्त डबे आहेत. जुलै महिन्यापासून या प्रकल्पाची उभारणी करण्यास सुरुवात होणार असून पुढच्या सहा महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Web Title : अब मेल, एक्सप्रेस के शौचालय होंगे दुर्गंध मुक्त: रेलवे करेगा स्थानीय उत्पादन

Web Summary : पश्चिम रेलवे मेल/एक्सप्रेस ट्रेनों में बायो-टॉयलेट की कार्यक्षमता बढ़ाने और दुर्गंध कम करने के लिए स्थानीय स्तर पर बैक्टीरिया का उत्पादन करेगा। 3 लाख लीटर की क्षमता वाली एक अवायवीय माइक्रोबियल इनोकुलम परियोजना स्थापित की जाएगी। इस पहल का उद्देश्य स्वच्छता को बढ़ाना, लागत बचाना और स्वच्छ भारत मिशन का समर्थन करना है।

Web Title : Stinky Train Toilets No More: Railways to Produce Bacteria Locally

Web Summary : Western Railway will produce bacteria locally to improve bio-toilet function and reduce odor in mail/express trains. A 3 lakh-liter anaerobic microbial inoculum project will be established. This initiative aims to enhance cleanliness, save costs, and support the Swachh Bharat Mission.