Join us  

'अभी इश्क मे इम्तिहाँ और भी है', राष्ट्रवादीच्या नवाबांनी घेतली राऊतांची फिरकी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 12:15 PM

रेप इन इंडिया या विधानावरुन राहुल यांनी माफी मागावी, अशी भूमिका भाजपानं घेतली.

मुंबई - काँग्रेसचा पाठिंबा घेऊन राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेनं सरकार स्थापन केलं. त्यामध्ये खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरली. मात्र, काँग्रेससोबत जुळवून घेताना शिवसेनेला कसरत करावी लागत आहे. माझं नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे. त्यामुळे माफी मागणार नाही, अशा स्पष्ट शब्दांमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर, संजय राऊत यांनी राहुल गांधींना सूचक इशारा दिलाय.  

संजय राऊत यांनी निवडणूक निकालानंतर शेरो-शायरीतून भाजपा नेत्यांवर जबरी टीका केली. राऊत यांच्या या शायरीटोल्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक हेही सहभागी होत. नवाब मलिकही शायरीद्वारे आपलं मत व्यक्त करत, संजय राऊत यांना ट्विटरमध्ये टॅग करत होते. आज पुन्हा नवाब मलिक यांनी राऊत यांना टॅग करुन एस शायरी शेअर केली आहे.

रेप इन इंडिया या विधानावरुन राहुल यांनी माफी मागावी, अशी भूमिका भाजपानं घेतली. मात्र राहुल यांनी माफी मागण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यावेळी त्यांनी थेट सावरकरांचा उल्लेख केला. त्यामुळे शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दोन ट्विट करुन राहुल गांधींना सूचक इशारा दिला. 'वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाही. जय हिंद,' असं संजय राऊत यांनी त्यांच्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे,' अशा शब्दांमध्ये राऊत यांनी राहुल गांधींचं नाव न घेता त्यांना सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस-शिवसेना यांच्यातील हे शीतयुद्ध नवाब मलिक यांनी शायरीतून व्यक्त केलं आहे. 

सितारों के आगे जहाँ और भी हैंअभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं: इक़बालअसे ट्विट नवाब मलिक यांनी केलं. हे ट्विट करुन मलिक यांनी संजय राऊतांची फिरकी घेतली, असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.   

टॅग्स :संजय राऊतनवाब मलिकशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस