Join us

आता शहरांकडे चला, राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा नारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 06:45 IST

वर्धापनदिन : नवीन चेहऱ्यांना संधी द्या - शरद पवार

मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचा चेहरा ग्रामीण आहे. राज्यात ५० टक्के शहरीकरण झाले आहे. त्यामुळे पक्षाची व्याप्ती शहरी भागात वाढण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. नवीन पिढीला संधी देत निवडणूक प्रक्रियेत सामावून घेतले पाहिजे, यासाठी प्रदेशाध्यक्षांनी लक्ष दिले पाहिजे. लोकांना बदल हवा आहे, त्यामुळे कष्टकरी तरूण नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे, असे मत राष्टÑवादी पक्षाने अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे केले.

राष्टÑवादी पक्षाच्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने यावेळी जलदिंडी काढण्यात आली. पवार म्हणाले, मुंबईत पक्षाचा विस्तार वाढवायला हवा. सत्ता असताना तरुण वर्ग आपल्याकडे होता. तरुणपिढीकडे लक्ष दिले नाही, त्यांची काळजी नाही घेतली नाही तर काय होईल याचा विचार पक्षात व्हायला हवा. अनुभवी लोकांसोबत तरुणांची संख्या असली पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा तरुण पिढी हवी. त्यामुळे आतापासूनच निवडणुकांची तयारी करायला लागा, असे आवाहन पवार यांनी केले. पंतप्रधान गुहेत जावून बसले. विज्ञानाच्या आधारे आधुनिक विचार केला जातो असा संदेश पंतप्रधानांनी देशाला द्यायला हवा मात्र हे गुहेत जावून बसतात हे योग्य नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला.

राज्यात कोट्यवधी रुपयांची जलसंधारणाची कामे झाली. परंतु त्यात टिपूसभरही पाणी शिल्लक नाही, असा आरोप प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला. बॉम्बस्फोटामधील आरोपी संसदेत ही बाब गंभीर मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांना तिकीट दिल्याबद्दल शरद पवारांनी टीका केली. संसदेत भगवे विचार मांडणाºयांची संख्या यावेळी जास्त आहे. ज्यांच्यावर गंभीर खटले आहेत अशांना तिकीट देणे ही लोकशाहीत गंभीर बाब आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी असणाºया एक भगिनी शेजारी बसणार आहेत, असा टोला पवार यांनी लगावला.ईव्हीएमवरून काका-पुतण्यात मतभिन्नताईव्हीएमवरुन शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभिन्नता दिसून आली. ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटमध्ये अडचण नसून निवडणूक अधिकाºयांकडून मतमोजणीवेळी गडबड होत असल्याचा संशय शरद पवार यांनी व्यक्त केला. आम्ही काही तंत्रज्ञांशी आणि विरोधकांशी चर्चा करून या प्रकरणाच्या खोलात जाणार आहोत,असेही त्यांनी सांगितले. तर लोकसभेची चर्चा आता बस्स झाली. तो निकाल कसा लागला कुणी लावला यावर चर्चा नको. ईव्हीएमला दोष देत आपल्या कामाकडे दुर्लक्ष करु नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले. 

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार