आता मुंबई ते भूज एअर इंडियाची थेट सेवा; १ मार्चपासून सेवेची सुरुवात

By मनोज गडनीस | Updated: January 5, 2024 17:33 IST2024-01-05T17:32:35+5:302024-01-05T17:33:05+5:30

एअर इंडिया कंपनीने मुंबई ते भूज या दोन शहरांदरम्यान दैनंदिन विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

Now direct service from Mumbai to Bhuj Air India Commencement of service from 1st March | आता मुंबई ते भूज एअर इंडियाची थेट सेवा; १ मार्चपासून सेवेची सुरुवात

आता मुंबई ते भूज एअर इंडियाची थेट सेवा; १ मार्चपासून सेवेची सुरुवात

मनोज गडनीस, मुंबई :  मुंबई ते गुजरातमध्ये विमान प्रवासाची जोडणी अधिक वाढविण्यासाठी आता एअर इंडिया कंपनीने मुंबई ते भूज या दोन शहरांदरम्यान दैनंदिन विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. येत्या १ मार्च पासून या सेवेची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

मुंबईतून सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी भूजसाठी कंपनीचे विमान उड्डाण करणार असून ते विमान सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. तर, भूजवरून तेच विमान सकाळी पुन्हा ८ वाजून ५५ मिनिटांनी मुंबईसाठी उड्डाण करणार असून ते सकाळी १० वाजून १० मिनिटांनी मुंबईत दाखल होईल. 

दरम्यान, एअर इंडिया कंपनीने मुंबई ते बंगळुरू या मार्गावर देखील आणखी एका विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली असून याची सुरुवात येत्या २२ जानेवारीपासून होणार आहे.

Web Title: Now direct service from Mumbai to Bhuj Air India Commencement of service from 1st March