Join us

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ई केवायसीसाठी १८ नोव्हेंबरची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 09:12 IST

Ladki Bahin Yojana e KYC: लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी ई केवायसी सुविधा

Ladki Bahin Yojana e KYC: राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी येत्या १८ नोव्हेंबरपूर्वी ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. महिलांनी या कालावधीत आपले ई केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी आणि लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत अदिती तटकरे यांनी बुधवारी मंत्रालयात बैठक घेतली.

१८ सप्टेंबर २०२५ पासून ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी २ महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थी महिलांनी १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तटकरे यांनी केले आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावे अशी अट टाकली आहे. मात्र अनेक अपात्र महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे. त्यांना वगळण्यासाठी राज्य सरकारने ई केवायसी बंधनकारक केले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ladki Bahin Yojana: E-KYC deadline extended to November 18th.

Web Summary : Beneficiaries of the Ladki Bahin Yojana must complete E-KYC by November 18th. The state government emphasizes transparency and aims to provide timely financial benefits to eligible women. Ineligible beneficiaries will be excluded through E-KYC verification.
टॅग्स :लाडकी बहीण योजनामहाराष्ट्र सरकारअदिती तटकरे