Notice regarding NDA and Naval Academy Examination of Public Service Commission | लोकसेवा आयोगाच्या NDA व नौसेना अकादमी परिक्षेबाबत जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

लोकसेवा आयोगाच्या NDA व नौसेना अकादमी परिक्षेबाबत जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

मुंबई - बृहन्मुंबई मधील 36 उपकेंद्रांवर रविवार 18 एप्रिल रोजी संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांचेमार्फत राष्ट्रीय रक्षा अकादमी व नौसेना अकादमी (1) परीक्षा 2021 ही स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे.

लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेसाठी महाराष्ट्र शासनाच्या 13 एप्रिल रोजीच्या Break the Chain आदेशातील मुद्दा क्र. 9 (डी) व महानगरपालिका आयुक्त बृहन्मुंबई यांचेकडील आदेश MCG/A/6202 यातील मुदा 1 नुसार उमेदवार व त्यांचेसोबत एक पालक यांना वैध प्रवेशपत्राच्या आधारे परीक्षेला हजर राहणेसाठी प्रवास करणे व कोविङ-19 प्रतिबंधीत क्षेत्राच्या बाहेर जाणेसाठी मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, यांची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Notice regarding NDA and Naval Academy Examination of Public Service Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.