Join us
Daily Top 2Weekly Top 5

सावरकर बदनामी प्रकरणी काँग्रेसला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 05:57 IST

स्वातंत्र्यवीर नव्हे माफीवीर आणि अंधारातील सावरकर हे शिदोरी मासिकातील

मुंबई : प्रदेश काँग्रेसचे मुखपत्र शिदोरी या मासिकात स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेसला नोटीस पाठविण्यात आली आहे. राष्ट्रीय सावरकर स्मारकाचे रणजित सावरकर यांनी वकिलांमार्फत आॅल इंडिया काँग्रेस, प्रदेश काँग्रेस आणि मासिकाचे संपादक रत्नाकर महाजन यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

स्वातंत्र्यवीर नव्हे माफीवीर आणि अंधारातील सावरकर हे शिदोरी मासिकातील दोन्ही लेख सावरकरांची बदनामी करणारे आहेत. जाणीवपूर्वक चुकीची, विपर्यस्त माहिती पसरविण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे तातडीने मासिकातील हे लेख मागे घ्यावेत अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा त्यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीत देण्यात आला आहे. 

टॅग्स :काँग्रेस