संजय राऊत यांच्या निवासस्थानाची रेकी नाही तर मोबाईल नेटवर्कचे टेस्ट ड्राईव्ह, तपासातून माहिती समोर
By मनीषा म्हात्रे | Updated: December 20, 2024 23:23 IST2024-12-20T23:19:48+5:302024-12-20T23:23:32+5:30
Sanjay Raut News: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, आमदार सुनील राऊत यांच्या भांडुप पूर्वेकडील निवासस्थानाची शुक्रवारी सकाळी दोन अनोळखी तरुणांनी रेकी केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. पोलिसांच्या तपासात रेकी नाही तर ते तरुण मोबाईल नेटवर्कचे नेटवर्क टेस्ट ड्रायव्ह करत असल्याची माहिती समोर आली आहे.

संजय राऊत यांच्या निवासस्थानाची रेकी नाही तर मोबाईल नेटवर्कचे टेस्ट ड्राईव्ह, तपासातून माहिती समोर
- मनीषा म्हात्रे
मुंबई - शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, आमदार सुनील राऊत यांच्या भांडुप पूर्वेकडील निवासस्थानाची शुक्रवारी सकाळी दोन अनोळखी तरुणांनी रेकी केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. पोलिसांच्या तपासात रेकी नाही तर ते तरुण मोबाईल नेटवर्कचे नेटवर्क टेस्ट ड्रायव्ह करत असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ११ वाजता विक्रोळी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल राऊत यांचे स्वीय सहाय्यक हितेश पटेल यांनी फोनद्वारे माहिती दिली. यामध्ये राऊत यांच्या मैत्री बंगल्यासमोर सकाळी ९.१५ वाजाताच्या सुमारास दोन संशयीत इसम दुचाकीवर येवुन त्यांचे घराचे रेकी करुन निघून गेल्याचे सांगितले. त्या तक्रारीवरुन मुंबई पोलीसांनी चौकशी सुरू केली. कांजूर पोलिसांनी आठ पथके नेमून सीसीटिव्हीच्या मदतीने तपास सुरू केला.
अखेर चौकशीत यामध्ये आढळलेले चार इसम हे सेलप्लॅन व इन्स्टा आयसीटी सोल्युशन या कंपनीचे कर्मचारी असल्याचे समोर आले. ते ईरिक्सन कंपनीकडून जीओ मोबाईल नेटवर्कचे नेटवर्क टेस्ट ड्रायव्ह करीत असल्याचे निष्पन्न झाले. तशी संबधीत कंपनीकडून खात्री करण्यात आली असल्याचेही पोलिसांनी नमूद केले.