Join us

लेक लाडकी किर्लोस्करांच्या घरची... होणार सून ही टाटांची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 11:40 IST

आणखी दोन उद्योग समूहांमध्ये जुळलं नातं

मुंबई: अंबानी आणि पीरामल यांच्यानंतर देशातल्या आणखी दोन उद्योग समूहांमध्ये नातं जुळलं आहे. रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल यांचा मुलगा नेविल आणि विक्रम किर्लोस्कर यांची कन्या मानसी यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. गेल्या आठवड्यात या सोहळा पार पाडला. डिसेंबर महिन्यात मुकेश अंबानी यांची कन्या इशा आणि अजय पीरामल यांचा मुलगा आनंद यांचा विवाह सोहळा अगदी धूमधडाक्यात संपन्न झाला. यानंतर चारच महिन्यात आणखी दोन उद्योग समूहांमध्ये नातेसंबंध जुळले आहेत. टाटा आणि किर्लोस्कर समूहाची मैत्री अतिशय जुनी असल्याचं सांगितलं जातं. नेविल आणि मानसी यांच्या साखरपुड्यानंतर हे नातं आणखी घट्ट झालं आहे. साखरपुड्याआधी नेविलनं बंगळुरूला जाऊन मानसीला लग्नासाठी मागणी घातली होती. गेल्या आठवड्यात मुंबईतल्या टाटा समूहाच्या अपार्टमेंटमध्ये नेविल आणि मानसी यांचा साखरपुडा झाला. यंदाच्या डिसेंबरमध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. नोएल टाटा ट्रेंटचे अध्यक्ष आणि टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. नोएल प्रसिद्धी माध्यमांपासून कायम दूर राहतात. त्यांना लेह आणि माया या दोन मुली आहेत. नेविलनं ट्रेंट ब्रँडच्या खाद्यपदार्थ विभागात काम केलं आहे. तर विक्रम किर्लोस्कर टोयोटो किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष आहेत. तर मानसी किर्लोस्कर सिस्टमची कार्यकारी संचालक आहे. 

टॅग्स :लग्नटाटाईशा अंबानीआनंद पिरामल