Join us

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; 'या' भागांमधील पाणीपुरवठा ११ नोव्हेंबरला बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 20:36 IST

जलवाहिनीच्या तातडीच्या दुरुस्ती कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार

मुंबई : जलवाहिनीच्या तातडीच्या दुरुस्ती कामासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सात विभागातील पाणीपुरवठा ११ नोव्हेंबर रोजी बंद राहणार आहे. सदर ७ विभागातील नागरिकांना १० नोव्हेंबर रोजी पाण्याचा पुरेसा साठा करण्याचे आवाहन आणि पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. 

सदर सात विभागांची नावे पुढील प्रमाणे- ए विभाग, ई विभाग, बी विभाग, एफ उत्तर, एफ दक्षिण, एम पूर्व, एम पश्चिम.

कोणकोणत्या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार?ट्रॉम्बे निम्‍नस्‍तर जलाशयावरील सी.जी. गिडवाणी मार्ग, रामकृष्‍ण चेंबूरकर मार्ग, सह्याद्री नगर, कस्‍तुरबा नगर, अजिज बाग, अयोध्‍या नगर, म्‍हाडा कॉलनी, भारत नगर, आणिक गाव, विष्‍णू नगर, प्रयाग नगर आणि गवाण पाडा, साई बाबा नगर, शेल कॉलनी, सिध्‍दार्थ कॉलनी, पोस्‍टल कॉलनी, एचपीसीएल, बीपीसीएल, आरसीएफ, बीपीटी, टाटा पावर, रामकृष्‍ण चेंबूरकर मार्गावरील मारवाली चर्च, आंबापाडा, माहूल गाव, म्‍हैसुर कॉलनी, वाशी गाव, माहूल पीएपी, मुकुंद नगर एसआरए, लक्ष्‍मी नगर, कलेक्‍टर कॉलनी, सिंधी सोसायटी, चेंबुर कॅंम्‍प तसेच चेंबुर नाका ते सुमन नगर मधील सायन - ट्रॉबे मार्गालगतचा भाग, परळ गाव, शिवडी पश्चिम आणि पूर्व, हॉस्पिटल झोन, काळे वाडी, कोकरी आगार, ऍन्टोपहील, वडाळा, गेट क्र. ४, कोरबा मिठागर, बीपीटी, डोंगरी ए झोन, वाडी बंदर, सेंन्‍ट्रल रेल्‍वे झोन, बीपीटी झोन, डॉकयार्ड झोन, हाथीबाग व हुसैन पटेल मार्ग आणि माऊंट रोड झोन, जे.जे. हॉस्पिटल, नेवल डॉक आऊटलेट झोन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल. 

टॅग्स :पाणीकपात