लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या पक्षातील महिला प्रदेशाध्यक्षपदाबाबतही चर्चा सुरू झाली आहे. यावर निर्णय घेण्यासाठी अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक शनिवारी मुंबईत पार पडली मात्र त्यामध्ये अंतिम निर्णय झाला नाही.
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी बैठकीला उपस्थित होते. पक्ष नेतृत्व या प्रकरणाचा आढावा घेत असून लवकरच याबाबत निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘तो’ राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून मी पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवत आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक्स समाजमाध्यमावर म्हटले आहे.
Web Summary : A meeting of Ajit Pawar faction leaders was held in Mumbai regarding Rupali Chakankar's party position after her state women's commission resignation. No final decision was made. The party leadership is reviewing the matter and will announce a decision soon.
Web Summary : रूपाली चाकणकर के राज्य महिला आयोग से इस्तीफे के बाद उनके पार्टी पद को लेकर मुंबई में अजित पवार गुट के नेताओं की बैठक हुई। कोई अंतिम निर्णय नहीं लिया गया। पार्टी नेतृत्व मामले की समीक्षा कर रहा है और जल्द ही निर्णय की घोषणा करेगा।