नो ब्लॅकआऊट, दोन वाहिन्यांची क्षमता आता ४,२०० मेगावॅटवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 11:53 IST2025-01-18T11:49:02+5:302025-01-18T11:53:04+5:30
मुंबईतील जुन्या वीज वाहिन्यांवर सध्या ताण पडत होता. त्यामुळे शहर व उपनगराच्या वीज मागणीत वाढ होत असताना वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले होते.

नो ब्लॅकआऊट, दोन वाहिन्यांची क्षमता आता ४,२०० मेगावॅटवर
मुंबई : वीज वाहिन्या जुन्या झाल्याने मुंबईत वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार सुरू होते. मात्र आता महापारेषणच्या ४०० केव्ही कळवा-पडघा वाहिनी क्रमांक १ वर नवीन उच्च क्षमतेचे कंडक्टर लावण्यात आल्याने आता मुंबई ‘ब्लॅक आऊट’पासून मुक्त होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्या कंडक्टरमुळे २ हजार मेगावॅटऐवजी आता ४ हजार २०० मेगावॅट वीज वाहून नेता येणार असल्याचा महापारेषणचा दावा आहे.
मुंबईतील जुन्या वीज वाहिन्यांवर सध्या ताण पडत होता. त्यामुळे शहर व उपनगराच्या वीज मागणीत वाढ होत असताना वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले होते. मात्र आता नवीन कंडक्टर बसवून १ आणि २ क्रमांकाच्या दोन वाहिन्यांची क्षमता वाढवण्यात आल्याने ही परिस्थिती पूर्णपणे बदलेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आव्हानांवर मात
या वाहिनीचे यापूर्वीच २७ किमीचे काम २०२३-२४ मध्ये पूर्ण झाले होते. उर्वरित २३ किमीचे काम आता पूर्ण झाले. या कामात रेल्वे, हायवे व उच्च विद्युत वाहिन्यांचे क्रॉसिंग, डोंगराळ भाग, वनजमीन, तसेच ठिकठिकाणी स्थानिकांचा विरोध यासारखी आव्हाने होती.
वाहिनींची क्षमता
वाहिनी क्रमांक १
आधीची क्षमता १००० मेगावॅट
सुधारित क्षमता २१०० मेगावॅट
वाहिनी क्रमांक २
आधीची क्षमता १००० मेगावॅट
सुधारित क्षमता २१०० मेगावॅट५००