Join us  

... यापेक्षा मोठा जोकच नाही, फडणवीसांच्या बॅनरची आमदाराने उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 3:20 PM

पुण्यात सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर झळकले आहेत. या मोठ्या होर्डिंग्जवरील एका कॅप्शनवरुन राष्ट्रवादीच्या आमदाराने फडणवीसांची खिल्ली उडवली आहे.

ठळक मुद्देपुण्यातील या बॅनरबाजीची चर्चा होतेच. आता, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोटोवरील कॅप्शनमुळे पुन्हा एकदा भाजपा-राष्ट्रवादी बॅनरचा वाद रंगला आहे

मुंबई - पुणे आणि होर्डिंग्ज, त्या होर्डिंग्जची चर्चा आणि व्हायरल हे आता नवीन नाही. कारण, बॅनरबाजीवरुन पुणेकर नेहमीच चर्चेत असतात. मग, ते आय लव्ह यूचे बॅनेर असोत किंवा, पावसात भिजणाऱ्या शरद पवारांच्या छायाचित्राचे भिंतीवरील रंगकाम असो, पुण्यातील या बॅनरबाजीची चर्चा होतेच. आता, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोटोवरील कॅप्शनमुळे पुन्हा एकदा भाजपा-राष्ट्रवादी बॅनरचा वाद रंगला आहे. 

पुण्यात सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर झळकले आहेत. या मोठ्या होर्डिंग्जवरील एका कॅप्शनवरुन राष्ट्रवादीच्या आमदाराने फडणवीसांची खिल्ली उडवली आहे. शहरातील या होर्डिंग्जवर देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख नव्या पुण्याचे शिल्पकार, असा करण्यात आला आहे. त्यावरुन राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटरवरुन फडणवीसांवर निशाणा साधला आहे.  “आता कमाल झाली. चक्क पुण्याचे शिल्पकार.. मला वाटतं यापेक्षा दुसरा मोठा जोक असू शकत नाही. धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त”, अशा शब्दात मिटकरी यांनी भाजपा समर्थकांना डिवचलं आहे. त्यामुळे, सोशल मीडियात भाजपा-राष्ट्रवादी नेटीझन्सचा वाद रंगल्याचे दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिन 22 जुलै रोजी असतो. यंदाही त्यांनी वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी न करता, गरजूंना मदत करण्याचं आवाहन भाजपानं केलं आहे. तसेच भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनीही कुठेही वर्तमानपत्रात जाहिरात किंवा बॅनरबाजी न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केलंय.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसकोरोना वायरस बातम्यापुणेआमदार