Join us

"विकासाची गंगा आणणाऱ्या मुंबईची आदित्यसेनेनं गटारगंगा केली’’ नितेश राणेंची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 09:05 IST

Nitish Rane: मुंबईतील विकासकामे, पायाभूत सुविधांचा अभाव आणि अन्य नागरी समस्यांवरून भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेला घेरण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पावसाळ्यात मुंबईत अनेक ठिकाणी तुंबलेले पाणी आणि नालेसफाईवरून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

मुंबई - शिवसेनेमध्ये मोठी बंडाळी होऊन राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता भाजपा नेत्यांनी शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महानगरपालिका हिसकावून घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे मुंबईतील विकासकामे, पायाभूत सुविधांचा अभाव आणि अन्य नागरी समस्यांवरून भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेला घेरण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पावसाळ्यात मुंबईत अनेक ठिकाणी तुंबलेले पाणी आणि नालेसफाईवरून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

देशात आर्थिक विकासाची गंगा आणणाऱ्या आपल्या मुंबईची मात्र आदित्यसेनेनं ठेकेदारांसाठी भ्रष्टाचाराची गटारगंगा केली आहे, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना पोकळ आश्वासने दिली. मात्र पहिल्या पावसामध्येच मुंबई मनपाची पोलखोल झाली आहे. नालेसफाईच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला.

टक्केवारीमधून मुंबईकरांचे पाच हजार कोटी रुपये बुडवले गेले. त्यात कंत्राटदारांची मजा झाली. मात्र मुंबईकरांना पावसात विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. शिवसेनेने मुंबईची तुंबई करून दाखवली आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. आता या आरोपाला शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर मिळतं हे पाहावं लागेल. 

टॅग्स :नीतेश राणे आदित्य ठाकरेमुंबई महानगरपालिकाशिवसेना