Join us  

मुंबईत नाईट कर्फ्यूला मुदतवाढ नाही; राज्य सरकारच्या आदेशानूसार पुढील भूमिका ठरवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2021 7:53 AM

रात्री ११ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत नाईट कर्फ्यू होता. या कर्फ्यूची ५ जानेवारीपर्यंत मुदत होती. 

मुंबई : नाईट कर्फ्यूचा कालावधी वाढवण्या संदर्भात राज्य सरकारकडून बुधवारी कुठलीही सूचना न आल्याने, मुंबई पोलिसांनी मुंबईतील नाईट कर्फ्यू न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याला मुंबई पोलीस प्रवक्ते चैतन्या एस यांनी दुजोरा दिला आहे.

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आल्याने ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेत, २१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी महानगरपालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यू लागू केला. त्यानुसार, रात्री ११ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत नाईट कर्फ्यू होता. या कर्फ्यूची ५ जानेवारीपर्यंत मुदत होती. 

नाईट कर्फ्यूची मुदत संपली असताना, हा कर्फ्यू वाढवण्या संदर्भात राज्य सरकारकडून बुधवारी कुठलीही सूचना न आल्याने, मुंबई पोलिसांनी मुंबईतील नाईट कर्फ्यू न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे शासनाच्या आदेशानुसार, पुढील भूमिका ठरविण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहाराष्ट्र सरकारमुंबई