प्रसूतीनंतर नवजात बाळाला रस्त्यावर टाकले;  गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 05:53 IST2026-03-01T05:53:39+5:302026-03-01T05:53:49+5:30

२३ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजता यशवंत नगर परिसरात रस्त्याच्या कडेला एक बालक टाकून दिल्याची माहिती मिळाली.

Newborn baby thrown on the road after delivery; Case registered | प्रसूतीनंतर नवजात बाळाला रस्त्यावर टाकले;  गुन्हा दाखल

प्रसूतीनंतर नवजात बाळाला रस्त्यावर टाकले;  गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सांताक्रूझ पूर्व येथे रस्त्याच्या कडेला नवजात बालकाला टाकून दिल्याच्या आरोपावरून वाकोला पोलिसांनी २२ वर्षीय तरुणीवर शनिवारी गुन्हा नोंदविला. पोलिसांनी या बालकाला  रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले होते. परंतु डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

२३ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजता यशवंत नगर परिसरात रस्त्याच्या कडेला एक बालक टाकून दिल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस कर्मचारी, फॉरेन्सिक पथक आणि दोन पंच साक्षीदारांसह घटनास्थळी पोहोचले. बालकाला सांताक्रूझ पूर्व येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात हलविण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी बालकाला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी विलेपार्ले पश्चिम येथील कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी बालकाच्या आईची ओळख पटवली आहे.  

या प्रकरणी पोलिसांनी तिच्या मैत्रीणीसह प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदवले. शवविच्छेदन अहवालानुसार, ‘आठ ते नऊ महिन्यांचा मृतजन्म झालेला गर्भ’ असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पुढील तपासासाठी डीएनए नमुने जतन करण्यात आले आहेत.

Web Title : नवजात शिशु को त्याग दिया; माँ के खिलाफ मामला दर्ज।

Web Summary : मुंबई के सांताक्रूज़ पूर्व में एक नवजात शिशु को त्याग दिया गया। पुलिस ने 22 वर्षीय माँ के खिलाफ मामला दर्ज किया। अस्पताल में भर्ती करने से पहले ही बच्चे को मृत घोषित कर दिया गया। जांच जारी; डीएनए नमूने सुरक्षित।

Web Title : Newborn abandoned, found dead; case filed against mother.

Web Summary : A newborn was found abandoned in Santacruz East, Mumbai. Police filed a case against the 22-year-old mother. The baby was declared dead before admission to the hospital. Investigation underway; DNA samples preserved.